Pradhan Mantri Awas Yojana : सामान्यांना रहायला पक्के घर मिळावे यासाठी सरकारकडून पीएम आवास योजना, म्हाडा योजना अशा विविध गृह योजना (Housing Scheme) चालवल्या जातात. अनेक लोक या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. आतापर्यंत पीएम आवास योजनेंतर्गत (PM Awas Scheme) ग्रामीण आणि शहरी भागातील अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल किंवा तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता सरकार काही लोकांकडून पीएम आवास योजनेचा हप्ता वापस घेत आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी अशा कारवाया करण्यात आल्या आहे. आता देखील सरकारने लिस्ट बनवली असून यात 102 लोकांचा समावेश आहे. आता या लिस्टमधील लोकांकडून योजनेचा हप्ता वापस घेतला जाणार आहे. यात नेमका कोणाचा समावेश आहे? हे जाणून घेऊ..
ज्यांच्याकडे आधीच पक्की घरे आहेत अशा अनेक लोकांनी सुद्धा पीएम आवास योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यात पुन्हा सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील मिलीभगत करून योजनेचा लाभ घेतला आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांनी कमिशन घेऊन अशा लोकांना योजनेचा हप्ता दिला आहे ज्यांनी घराचे बांधकाम केले नाही आणि गायब झाले. अनेकांनी योजनेचा हप्ता घेऊन टीव्ही, फ्रीज, मोटरसायकल यासारख्या वस्तू विकत घेतल्या. कुठलीही पडताळणी न करता योजनेचा हप्ता जारी करण्यात आला का? आता असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी देखील यात गुंतण्याची शक्यता आहे.
अरे वा! असा असेल म्हाडाचा गोरेगाव येथील नवीन 2 BHK फ्लॅट, येथे क्लिक करून पहा सॅम्पल फ्लॅट..!
या लिस्ट मध्ये कोण?
मिळालेल्या माहितीनुसार 2019-20 मध्ये शेकडो लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. ज्यात 102 हून अधिक असे लाभार्थी आहे ज्यांनी पहिला आणि दुसरा हप्ता घेऊन सुद्धा घर बनवले नाही. आता अशा लोकांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहे. हे 102 बोगस लाभार्थी मध्य प्रदेशातील गोहरगंज रायसेन येथील असून यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.