रिंकु राजगुरु ला मिळाली मोठी संधी, बॉलिवूड च्या या अभिनेत्या सोबत करणार काम..!

29 एप्रिल 2016 रोजी रिलीज झालेल्या सैराट सिनेमाने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. तरुणांमध्ये या सीनेमाचे विशेष आकर्षण दिसले. सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत असलेले आर्ची आणि परशा महाराष्ट्रातील घरा-घरात पोहोचले. सर्वात महत्वाचं म्हणजे सिनेमामधील गानी खुप हिट झाली.

Best T-shirt for men

प्रोड्यूसर नागराज मंजूळे यांचा सैराट सिनेमा सर्वात लोकप्रिय ठरला. या सिनेमाचा एकुण चार करोड रुपये खर्च होता आणि सिनेमाने एकुण कमाई 110 करोड केली.

सिनेमात अभिनेत्रीच्या मुख्य भूमिकेत असलेली आर्ची सध्या सोशल मीडिया वर खुप ऐक्टिव असते. ती आपल्या करिअर बद्दल सर्व काही शेयर करत असते.

21 मार्च रोजी आर्चीने म्हणजेच रिंकु राजगुरुने आपल्या इंस्टाग्राम वर आपन एक नवीन सिनेमात काम करत असल्याचं सांगितलं होतं. तिने स्वतः चा फोटो शेयर करत शूटिंगचा पहिला दिवस असल्याचं सांगितलं. दिग्दर्शक सार्थक दास गुप्ता यांच्या प्रोजेक्ट मध्ये ती सद्या काम करत आहे. दिग्दर्शक सार्थक गुप्ता आपल्या शूटिंगचे फोटो व वीडियो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अमोल पालेकर आणि रिंकु या प्रोजेक्ट मध्ये सोबत दिसणार आहे. या सिनेमामध्ये अमोल पालेकर वकिलाच्या भूमिकेत असनार असल्याच सार्थक दास गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवरुन दिसत आहे.

सध्या या सिनेमाची शूटिंग मुंबई मध्ये होत असल्याच समजतय. अजुन तरी या सिनेमाबद्दल परिपूर्ण माहिती मिळालेली नाही.

Read Marathi सोबत अपडेट राहण्यासाठी वरील फेसबुक चिन्हावर क्लिक करुन फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Comment