सगळं जग आमच्या साहेबांना “80 वर्षांचा तरुण” म्हणून ओळखतं, आणि तुम्ही

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील व देशातील परिस्थिती खुपच बिघडली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पण लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वांना लसीकरण करणे अशक्य झाले. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 45 वर्ष वयावरील नागरिकांना लस दिली जात आहे. दरम्यान अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचे पुत्ने तन्मय फडणवीस यांनी कोरोनाची दुसरी लस घेतल्याचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले व ते व्हायरल झाले. या फोटोंमुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं सोशल मीडिया वर पहायला मिळालं.

तन्मय फडणवीस यांचे वय 23 असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी नुकताच नागपूर पासून चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले नेशनल कैंसर इन्स्टिट्यूट मध्ये लसीचा दुसरा डोस घेतला. सरकारच्या नियमांनूसार 45 वर्ष वयावरील नागरिकांना लस दिली जाते. मग अशा परिस्थितीमध्ये तन्मय यांना लस मिळाली कशी? असा सवाल करत, काहींनी प्रश्न उपस्थित केला आहे. विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकेचा वर्षाव केला आहे. काहींनी ‘चाचा विधायक हें हमारे’ असा हॅशटॅगचा वापर करत सोशल मीडिया वरुन त्यांच्यावर चांगलाच निशाना साधला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीटर वर ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. ‘सगळं जग आमच्या साहेबांना “80 वर्षांचा तरुण” म्हणून ओळखतं, आणि तुम्ही तुमच्या तन्मय ला “25 वर्षांचा म्हातारा” म्हणून लस टोचतात’. #चाचा_विधायक_हें_हमारे असा हॅशटॅग लिहुन टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या कडून स्पष्टीकरण
दरम्यान, या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, तन्मय फडणवीस हा माझा दुरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषावर घेतली, याची मला कल्पना नाही. ती जर मार्गदर्शक तत्वांप्रमाने असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल तर पुर्णपणे अयोग्य आहे. निकशात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी 18 वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे. असं देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

तन्मय फडणवीस यांनी पोस्ट केली डिलीट
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तन्मय ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन पोस्ट डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे. तन्मय फडणवीस यांनी पोस्ट डिलीट का केली? असा प्रश्नही काहींनी विचारला आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment