रशियाची ‘स्पुटनिक’ लस आता भारतात..!

दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी संपुर्ण जगातील शास्त्रज्ञांची झोप उडालेली आहे. सर्व देश आप-आपल्या परीने प्रयत्न करत आहे पण काहींना या मध्ये अपयश येतांना दिसतय. त्यामुळे सध्या जगात लसींच्या आयात-निर्यातवर भर दिला जात आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर लॉकडाउन आणि लसीकरण हेच पर्याय असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे संपुर्ण देशात लसीकरणाला प्राधान्य दिलं जातय. पण अशा परिस्थितीमध्ये देशातील काही राज्यांनी लस पुरवठा कमी पडत असल्याच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याची तक्रार केली आहे. दरम्यान एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक’ लसीच्या वापराला आता भारत सरकारने होकार दर्शवला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लसींचे सध्या देशात लसीकरण सुरू आहे. देशात 45 वर्ष पुढिल वयाच्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे. केंद्र सरकारकडे अनेक राज्यांनी लस पुरवठ्या बाबत तक्रारी केल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये देशाला स्पुटनिक लस मिळाल्याने देशातील लसींची चनचन दुर होणार आहे आणि यामुळे कोरोनाला रोखण्यात मोठी मदत होईल.

रशिया सरकारचा दावा
‘स्पुटनिक’ लस संदर्भात रशिया सरकारने दावा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नूसार ‘स्पुटनिक’ लस 90 टक्के प्रभावी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
रशियाने खुप कमी वेळात ‘स्पुटनिक’ लस उपलब्ध केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर लसीबाबत संशय व्यक्त केला जात होता.

देशामध्ये सध्या लसीकरण मोहीम खुप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या नव्या टप्प्या मध्ये नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्यामुळे काही राज्यात तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे केंद्र सरकारने इतर लस निर्मितीचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत देशात अजून पाच कंपन्यांची लस उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, देशात ‘स्पुटनिक’ लसीला वापरण्याची परवानगी मिळाली आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment