धक्कादायक ! चीन मध्ये आढळून आले अनेक व्हायरस, कोरोना पेक्षा खतरनाक असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..!

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून संपुर्ण जगाला हैराण करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस ने पुन्हा आपले थैमान सुरू केले आहे. या टप्प्या मध्ये खुप भयानक पध्दतीने कोरोनाचा सामना करावा लागत असतांना संपुर्ण जगासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

चीनच्या वुहान शहरामध्ये असलेल्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या प्रयोग शाळेत कोरोना व्हायरस पेक्षा खतरनाक असे अनेक प्रकारचे नवे आणि अधिक घातक व्हायरस असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. संशोधकांच्या एका पथकाने दावा केला आहे की चीनच्या वुहानमध्ये अद्यापही अनेक प्रकारचे नवे आणि अधिक घातक कोरोना विषाणू आहेत. 

चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना महामारीचा संपुर्ण जगाला सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा चीन मधून नवीन संकट जगावर येण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. येणारे संकट खुप भयानक असू शकते, नवीन विषाणू अधिक घातक असु शकतात असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. कारण म्हणजे कृषी प्रयोगशाळांमध्ये मेडिकल रिसर्च सेंटर किंवा व्हायरॉलॉजी लॅबसारखी मजबूत सुरक्षा नसते.

वैज्ञानिकांचे म्हणने आहे की ” या व्हायरस वर व्यवस्थित नियंत्रण जर ठेवता आले नाही तर हे खुप मोठे संकट जगासाठी असेल आणि सर्वांसाठी ही खुप मोठी समस्या बनेल”. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या लॅब मधून कोरोना पसरला असल्याचा जगातील शास्त्रज्ञांचा दावा आहे. चीनने मात्र आपली चांगलीच पाठ राखन करत हे सर्व आरोप फेटाळले आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment