Covid19 Vaccination : लस घेण्यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील पहा काय म्हणतात..!

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाठेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाठेचा सामना करण्यासाठी तसेच सुसज्ज राहण्यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक बीड येथे पार पडली. कोरोनाच्या सतत येणाऱ्या लाठेचा सामना करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे असे संदेश राजकीय नेते, अभिनेते आणि शासन, प्रशासन वेळोवेळी देत आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी लस घेण्यासंदर्भात ट्वीट करून आपली भुमिका मांडली आहे.

औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील हे उच्चशिक्षित मानले जातात. आता त्यांनी शहरामध्ये एक मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी शरामध्ये जागोजागी बोर्ड लावायला सुरवात केली आहे. त्या बोर्ड वर लिहिलं आहे “कोरोना से हिफाजत के लिये हमने तो वेकसीन ली है. और आपने?”. या बोर्डच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांमध्ये कोरोना लसीसंदर्भात असलेले गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी आता लॉकडाउनकडे एकमात्र पर्याय म्हणून बघितले जात नाही. लॉकडाउनमूळे बेरोजगारी आणि उपासमारीची समस्या उद्भवते म्हणून शासन आणि प्रशासन जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देत आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी लस घेण्यासंदर्भात केलेल्या ट्वीट ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांनी त्यांचे कौतुकही केलं आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.