बाप रे ! कांद्याचे भाव पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कांदा विकतोय कवडीमोल दरात..!

शेअर करा

Shekhar Dandge : कांदा आज रोजी खाणाऱ्याला कमी आणि पिकवणाऱ्याला जास्त रडवत आहे. कांद्याचे भाव पाहून शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

सध्या बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याला 1 रुपया ते 5 रुपयाचा दर मिळत आहे. कांद्याला मिळणारा दर लक्षात घेता एक दिवस कांदा उत्पादक शेतकऱ्याचे दिवाळे निघेल. कांदा विकून मिळणाऱ्या पैशात साधा शेतीचा खर्च काढणे अवघड झाले आहे.

कांदा पिकवतो शेतकरी मात्र व्यापारी मालामाल

बाजार समित्यांमध्ये कांदा कमी किमतीत खरेदी करून तोच कांदा किरकोळ ग्राहकाकडे विक्रीला येई पर्यंत तीन चार पटीने त्याची किंमत वाढते.

या सर्व व्यवहारात फक्त दलालांचा आणि व्यापाऱ्यांचाच सर्वात जास्त फायदा होताना दिसतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कांदा msp अंतर्गत आणला जावा अशी मागणी शेतकरी सातत्याने करतात.

कांद्याचे किमान आधारभूत दर का जाहीर केले जात नाही असा सवाल शेतकरी सरकारला करत असतात…

कांदा उत्पादक संस्थेचे संस्थापक असलेले श्री भरत दिघोळे यांच्या मते, सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्यांना कांदा पिकवणारा शेतकरी कोणत्या समस्यांना तोंड देत आहे हे दिसत नाही.

येथे पहा आजचे कांदा बाजार भाव

कांदा काढणी पासून ते साठवनुक करण्यापर्यंत कांद्यावर उष्णतेचा परिणाम होत असतो. परिणामी कांदा चाळीत भरल्यानंतर खराब होण्याची दाट शक्यता असते.

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे आणि सध्याच्या सतत च्या पावसामुळे बहुतांश चाळीतील अंदाजे 25 ते 30 टक्के कांदा खराब झाला आहे.

भावातील घट आणि त्यात चाळीतील कांदा खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

कांदा पिकवण्यासाठी येणारा खर्च आणि विक्रीतून मिळणार नफा याचे गणित मांडले असता शेतकऱ्याला लावलेला खर्च खिश्यातून भरावा लागत आहे.

शोकांतिका अशी आहे की भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आतापर्यंत सरकारने कांद्या साठी कुठलेही विशेष धोरण राबवले नाही.

जेव्हा जेव्हा कांद्याचे भाव वाढु लागतात त्या नंतर लगेच सरकार कांदा आयात करून कांद्याचे भाव कमी करण्याचे प्रयत्न करते. यातून असे कळते की सरकार फक्त कांदा स्वस्त विकला जावा यासाठी प्रयत्नशील असते.

सरकारी आकडेवारी नुसार 2021-2022 या वर्षात कांद्याचे अपेक्षित उत्पादन 3,17,03,000 मेट्रिक टन आहे, जे मागील वर्षी पेक्षा 50,62,000 मेट्रिक टन अधिक आहे. असे झाल्यास कांद्याचे भाव आणखी पडतील असा अंदाज आहे.

महाराष्ट्र भारतातील सर्वात जास्त कांदा पिकवणारे राज्य आहे महाराष्ट्र देशाच्या एकूण उत्पादनापैकी 40% कांदा पिकवतो. तरीही महाराष्ट्रात कांद्याला 1 रुपया किलो भाव आहे ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.

शेती विषयक माहितीसाठी आमचा व्हॉट्सऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply

Your email address will not be published.