शेतीतून मोठे उत्पन्न मिळवण्यासाठी या 7 गोष्टी लक्षात ठेवा…!

एकविसाव्या शतकात मानव जवळ जवळ सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवाला सर्व गोष्टी करणे शक्य होत आहे. त्यातच मानव आजच्या घडीला कृषी क्षेत्रात पण आघाडीवर आहे.

आज इस्राईल(israil) देश कृषी क्षेत्रात खूप आघाडीवर आहे, आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी लागवड क्षेत्र असून सुद्धा भरघोस उत्पन्न घेत आहे. पण आज रोजी भारतीय शेतकऱ्यांकडे भरपूर जमीन उपलब्ध असून सुद्धा अपेक्षित उत्पन्न मिळवू शकत नाहीये.

रासायनिक खते, कीटकनाशक, टॉनिक इ. चा अतोनात वापर करून उत्पादन खर्च वाढत चालला आहे. जर भारतीय बळीराजाला उत्पादन खर्च कमी करून कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकरी राजाने खाली दिलेल्या या 7 गोष्टी नक्कीच लक्षात घ्यायला हव्या..(Seven things to keep in mind to get the most out of farming…)

(1) रासायनिक खतांचा सुयोग्य वापर

सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अधिक उत्पनाच्या लालसेपोटी रासायनिक खतांचा प्रमाणाच्या बाहेर वापर करत आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी नापीक होत चाललेल्या आहे. त्यामुळे खतांचा योग्य प्रमाणात वापर करून शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवू शकतो.

(2) जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे

दिवसेंदिवस जमिनी मध्ये असलेल्या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे जमिनीचा पोत कमी होत चाललेला आहे. जमीन चांगली राहण्यासाठी आपण प्रक्रिया केलेल्या शेणखताचा, गांडूळ खताचा, हिरवळीच्या खतांचा वापर जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी करू शकता.

(3) पाण्याचा सुयोग्य वापर

पारंपारिक पद्धतीने केलेल्या पाणी भरणा पद्धतीने पाण्याचा जास्त वापर होतो. पाट पाणी दिल्याने जमीनीतील क्षार तळावर येऊन साचून जमीन क्षारवाट बनून नापीक होऊ शकते. त्यामुळे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, rain gun इ. साधनांचा वापर करून आपण पाणी बचत करून जास्त क्षेत्रावर भरघोस उत्पन्न घेऊ शकता.

(4) जिवाणू खतांचा वापर

कमी होत चाललेल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणा मुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या कमी होत चालली आहे. जसे की psb(phosprous solubilizing bacteria), kmb(potassium solubilizing bacteria), नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू यांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढते. या जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी आपण बाजारात मिळणारे तरल किंवा पावडर स्वरूपातील जिवाणू खतांचा वापर शेतीत करू शकता.

(5) संशोधित बियाण्यांचा वापर

पारंपारिक बियाणे वापरून हवे तसे उत्पन्न मिळवता येत नसल्याचा अनुभव अलीकडे येऊ लागला आहे. उत्पन्न पूर्वी पेक्षा अधिक करायचे असेल तर संशोधित बियाण्यां नसल्याने आज गतील शेतकरी संशोधित बियाण्यांचा वापर करून आपले उत्पादन वाढवू शकतो.

(6) आधुनिक यंत्रांचा वापर

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी आधुनिक यंत्रांचा वापर करून कमी वेळेत जास्त काम करून मोठे उत्पन्न मिळवू शकतो. त्याला लागणाऱ्या मानवी बळाची गरज यातून भरून निघू शकते.

(7) शेती पूरक व्यवसाय

वाढलेल्या किमतींमुळे शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामूळे शेतीसोबतच एखाद्या शेती पूरक जसे की शेळीपालन, कुकुट पालन, दुग्ध व्यवसाय इ. च्या माध्यमातून शेतकरी आपल्या उत्पन्नात भर पाडू शकतो.

तर शेतकरी बांधवांनो तूम्ही वरील 7 गोष्टी आमलात आणून आपल्या शेतीला नक्कीच नफ्याची शेती बनऊ शकता आणि आपल्या उत्पादनात भर पाडू शकता.

अशाच शेती व बाजार भाव विषयक माहितीसाठी आमचा Whats App ग्रुप जॉईन करा..

Read Marathi WhatsApp Contact

निष्कर्ष – या लेखात आपन अशा 7 गोष्टी बघितल्या आहे ज्यावर लक्ष दिल्याने आपले शेतातील उत्पन्न नक्कीच वाढवता येईल…

Leave a Comment