शरद पवारांनी पक्षातील नेत्यांवर केली नाराजी व्यक्त; अनिल देशमुख प्रकरण..!

मुंबई : सिल्वर ओक मध्ये पार पडलेल्या बैठकीत शरद पवारांनी आपल्या पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख प्रकरणात पक्ष आपली भुमिका मांडण्यात कमी पडल्याने शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांच्या साठी पक्षाने भुमिका मांडली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या बैठकीला राष्ट्रवादीचे बरेच नेते उपस्थित होते. वळसे पाटील, जयंत पाटील, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली होती. शरद पवार म्हणाले की “अनिल देशमुख जेव्हा सीबीआय चौकशीला सामोरे जातील त्यावेळेला पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहील”.

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख प्रकरण सीबीआय कडे सोपवल्यामुळे अनिल देशमुखांनी राजिनामा दिला होता. या घडामोडीमुळे आघाडी सरकार ला चांगलाच धक्का बसला. राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळल्या होत्या.

विरोधक अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत असतांना सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सर्व याचिका फेटाळत खुप मोठा धक्का दिला. यामुळे महाविकास आघाडी सरकार मध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment