जळगांव मध्ये धक्कादायक प्रकार, गादीमध्ये भरण्यात येत होते वापरण्यात आलेले मास्क!


महाराष्ट्र : जळगांव मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कापसाच्या रुई ऐवजी वापरण्यात आलेले मास्क गादी मध्ये भरण्यात येत होते.
एकीकडे पूर्ण देश कोविड १९ संसर्गाशी झगडत आहे, आणि संसर्ग थांबवण्यासाठी सावधगिरी बाळगण्यात याव्यात अशा सूचना प्रशासन वेळोवेळी देत आहे. अशी परिस्तिथी असतांना गादी मध्ये वापरण्यात आलेले मास्क किती धोकादायक असू शकतात याचं जनतेने गांभीर्य लक्षात घ्यावं.
जळगांव च्या MIDC पोलिस स्टेशन ला अशी माहिती मिळाली की, महाराष्ट्र गादी सेंटर येथे कापसाच्या रुई ऐवजी वापरण्यात आलेल्या मास्कचा वापर करण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलिस प्रशासन हे गादी बनवणाऱ्या कारखान्यामध्ये पोहचले, आणि त्यांनी बघितले की गादिमध्ये वापरण्यात आलेले मास्क भरण्याचे काम चालू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गादी सेंटरचे मालक यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकारात गादी सेंटरचे मालक यांच्या व्यतिरिक्त कोणी सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे.
पोलिसांना घटनास्थळावरून वापरण्यात आलेल्या मास्क चा साठा मिळालेला आहे. सदर साठ्याला आग लाऊन जाळून टाकण्यात आले आहे.
एकीकडे पुरा देश कोरोना महामारिशी लढत आहे तर दुसरीकडे अश्या घटना कोरोणा योध्यांचे खाच्चिकरण करण्यासारख्या आहेत. सद्या पोलीस प्रशासन सदर प्रकारची चौकशी करत आहे. सदर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment