कॉलेजचा ऑनलाइन वर्ग चालू असताना अश्लील व्हिडिओ दाखवला; पहा कुठे घडली घटना..!

मुंबई : कोविडने जगात धुमाकूळ घातला आहे. अलिकडेच देशातील दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे काही ठिकाणी शाळा-कॉलेज सुरू झाले आहे. ज्या जिल्ह्यांत अजून पण धोका कायम आहे त्या जिल्ह्यांत निर्बंध कडक ठेवण्यात आले आहे. सर्वत्र मुलांचे शिक्षण ऑनलाइन पध्दतीने घेतले जात आहे पण ते किती सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे कारण असे की मुंबई येथील कॉलेजच्या चालू ऑनलाइन वर्गा मध्ये अश्लील व्हिडिओ लावण्याचा प्रकार घडला. तांत्रिक ह्या घटनेने पालकांची चिंता वाढली आहे.

नेमका काय प्रकार घडला?
मुंबई येथील एका नामांकित कॉलेजचा ऑनलाइन वर्ग चालू असताना एका अज्ञात सायबर हॅकर ने चालू ऑनलाइन वर्गात प्रवेश करून अश्लील व्हिडिओ लावला. हा प्रकार घडल्यानंतर कॉलेजच्या प्राध्यापकांनी जूहू पोलिसांत तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविला आहे.

ऑनलाइन वर्ग चालू असताना अश्लील व्हिडिओ दाखवणे, शिक्षकांना शिवीगाळ करणे असे प्रकार बऱ्याच दिवसांपासून घडत आहे. अशा प्रकारचे कृत्य फक्त वैयक्तिक आनंदासाठी केले जात असल्याचे समजते.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.