बाप रे ! एवढ्या संपत्तीची मालक आहे श्रद्धा कपूर

Shraddha Kapoor information in Marathi
Shraddha Kapoor Biography in Marathi

श्रद्धा कपूर एक स्मार्ट आणि सुंदर बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 3 मार्च 1987 मध्ये मुंबई येथे श्रद्धा कपूरचा जन्म झाला. आता श्रद्धा 33 वर्षांची आहे. चिरकूट तिचे टोपणनाव आहे. ती आपल्या आशिकी 2 या सिनेमा मधील अभिनय आणि गाण्यांमूळे खुपच प्रसिद्ध झाली. आशिकी 2 या सिनेमामूळेच तिला खरी प्रसिद्धी मिळाली. श्रद्धा कपूरची कौटुंबिक माहिती, शिक्षण, छंद आणि तिची एकून संपत्ती या बद्दल आपन माहिती घेणार आहोत (Shraddha Kapoor information in Marathi). श्रद्धा कपूर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आहे. तिच्या आईचे नाव शिवांगी कोल्हापुरी असं आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरची आई मराठी आहे. श्रद्धा कपूर ने आपल्या करिअरची सुरवात 2010 मध्ये आलेल्या ‘तीन पत्ती’ नावाच्या सिनेमापासून केली होती. या सिनेमाची जादू बॉक्स ऑफिस वर चालली नव्हती पण 2013 मध्ये रिलीज झालेल्या ‘आशिकी 2’ सिनेमापासून तिच्या खऱ्या करिअरला सुरुवात झाली. तेव्हा पासून तिने एका मागे एक अशा 20 ते 22 सिनेमांमध्ये काम केले.

Shraddha Kapoor information in Marathi
Image sourse : Facebook.com/ShraddhaKapoor

श्रद्धा कपूरची कौटुंबिक माहिती (Shraddha Kapoor’s family information in Marathi)

  • वडील – शक्ती कपूर
  • आई – शिवांगी कपूर
  • भाऊ – सिद्धांत कपूर
  • मावशी – पद्मिनी कोल्हापुरी

श्रद्धाचे लहानपणीचे फोटो (Shraddha Kapoor’s childhood photos)

Shraddha Kapoor information in Marathi
Image sourse : Instagram.com/ShraddhaKapoor
Shraddha Kapoor Biography in Marathi
Image sourse : Instagram.com/ShraddhaKapoor

श्रद्धा कपूरचे शिक्षण (Shraddha Kapoor education in Marathi )


श्रद्धा कपूरच्या शिक्षणाचा जर विचार केला तर श्रद्धा अभ्यासामध्ये खुप तरबेज होती. 12 वी च्या वर्गामध्ये श्रद्धाला 95 टक्के मिळाले होते. तिच्या आई वडीलांची खुप इच्छा होती की तिने शिक्षणामध्ये ऊंची गाठायला हवी पण तिला अभिनेत्री बनायचे होते. श्रद्धा कपूरचे प्राथमिक शिक्षण जम्नाबाई नर्सी स्कूल मुंबई आणि अमेरिकन स्कूल ऑफ़ बॉम्बे इथे झाले. पुढे तिचे कॉलेज चे शिक्षण USA मधील बोस्टन यूनिवर्सिटी मध्ये झाले.

श्रद्धा कपूरची सोशल मीडिया (Shraddha Kapoor’s Social Media information in Marathi)

श्रद्धा कपूर आपल्या सोशल मीडिया वर खुप ऐक्टिव असते. ती नेहमी आपले नवनवीन फोटो आपल्या इंस्टाग्राम वर अपलोड करत असते. तिच्या इंस्टाग्राम ला 65 मिलियन फॉलोवर आहेत. श्रद्धा कपूरच्या इंस्टाग्राम वर फक्त 4 रिल अपलोड केलेल्या आहेत. तिला रिल मध्ये जास्त इंटरेस्ट दिसत नाही. 41 मिलियन फॉलोवर श्रद्धा कपूरच्या फेसबुकला आहेत.

श्रद्धा कपूरचे छंद (Shraddha Kapoor’s Hobbies in Marathi)

श्रद्धा कपूरला स्वयंपाक कारायला खुप आवडते. अभिनय, डान्स आणि सोबतच तिला गाणी गायला खूप आवडतात. वाचन करण्याची आवडही श्रद्धाला आहे. प्रवास करणे आणि गाणी ऐकणे या मध्ये देखील तिला इंटरेस्ट आहे. (Shraddha Kapoor Interests Information in Marathi)

श्रद्धा कपूरची संपत्ती (Shraddha Kapoor net worth in Marathi)

श्रद्धा कपूर अभिनय करण्यासोबतच मोठ-मोठ्या ब्रँड कडून देखील खुप कमावते. आज आम्ही तुम्हाला श्रद्धा कपूरची एकून संपत्ती किती आहे? (Shraddha Kapoor net worth in Marathi) याबद्दल माहिती देणार आहोत.

Caknowledge या वेबसाइट च्या रिपोर्टनूसार श्रद्धा कपूर बॉलिवूड मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनय आणि मोडेलिंग सह अजून बऱ्याच मार्गाने ती खुप पैसा कमावते.

श्रद्धा कपूरच्या एकून संपत्तीचा जर विचार केला तर अंदाजे 57 ते 58 कोटी रुपये संपत्तीची ती मालक आहे. 5 कोटी रुपये ती एका सिनेमामध्ये काम करण्याचे घेत असते. सद्या वर्तमान काळात श्रद्धाकडे अनेक सिनेमांचे प्रोजेक्ट असल्याची माहिती आहे. इंटरनेट वरून मिळालेल्या माहिती नूसार श्रद्धा स्वतःचा खर्च स्वतः उचलते.

हे पण वाचा

बस स्टँड वर पळतांना दिसले मोदी? वाचा काय आहे सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक दिवसाचा खर्च? जाणून घ्या रोचक माहिती

बघा पाऊस सुरु असताना कसा दिसतोय जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सुंदर सप्तकुंड धबधबा

2 thoughts on “बाप रे ! एवढ्या संपत्तीची मालक आहे श्रद्धा कपूर”

Leave a Comment