“तेरे ड्रीम मे मेरी एण्ट्री” म्हणत राखी सावंत ने घेतला लसीचा पहिला डोस, पहा व्हिडिओ..!

मुंबई : भारत सरकारने कोरोनावर विजय मिळवण्यासाठी वय वर्ष 18 च्या पुढील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. मधल्या काही काळात लसींचा तूटवडा जाणवत होता त्यामुळे सरकारने ज्या वयोगटातील नागरिकांची इम्यूनीटी कमजोर असते अशाच नागरिकांच्या वयोगटासाठी म्हणजेच 45 वयाच्या पुढील नागरिकांसाठी लस देण्याचे आदेश दिले होते. अजून देखील लसींचा पुरवठा आणि नागरिकांचा प्रतिसाद बघून सर्व वयोगटाच्या नागरिकांना लस दिली जाते. आता लस घेण्यासाठी बाॅलिवूड मधील कलाकारांनी देखील मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यायला सुरवात केली आहे.

नेहमी वाद-विवाद आणि चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंतने नुकताच लसीचा पहिला डोस घेतला आहे. डोस घेत असताना “तेरे ड्रीम मे मेरी एण्ट्री, मेरे ड्रीम मे तेरी एण्ट्री” असं गाणं म्हणतानाचा तिचा हा व्हिडिओ चर्चेचा भाग ठरला आहे. राखीने काही दिवसातच रिलीज होणारे आपले गाने लस घेताना म्हटले आहे आणि दर्शकांना ते व्हिडिओ गाणे पहा अस देखील तिने म्हटलं आहे.

आपल्या प्रेक्षकांना लस घेण्याचे देखील आवाहन तिने केले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने लस सुरक्षीत आहे. मी घेतली तुम्ही पण घ्या असा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. त्यामूळे तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.