अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन मजूर घेऊ शकणार शेत जमीन विकत, SBI करणार मदत..!

शेत जमीन विकत घेणं हे छोट्या शेतकऱ्यांसाठी व भूमिहीन मजूरांसाठी स्वप्न पडल्या सारखं असतं कारण एवढी मोठी रक्कम जमा करण त्यांच्यासाठी शक्य नसते. मजूरी व अल्प शेती व्यतीरीक्त उत्पन्नाचं दुसरं कुठलं साधन नसल्यामूळे असे आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी व मजूर आपली आर्थिक प्रगती करू शकत नाही. म्हणूनच अलीकडे सरकार व बँका या दुर्बल घटकांच्या प्रगती करण्याकडे विशेष लक्ष देत आहे.(Small and landless farmers will be able to buy farm land, SBI will help)

अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन मजूर घेऊ शकणार शेत जमीन विकत

आपली स्वतः ची शेत जमीन असायला हवी असं प्रतेकाचं स्वप्न असतं. पण शेत जमीन विकत घेण्यासाठी खुप मोठी रक्कम द्यावी लागत असल्यामूळे अनेकांचे हे स्वप्न स्वप्नच राहून जाते. आता शेत जमीन विकत घेण्याचे तुमचे हे स्वप्न भारतीय स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) पुर्ण करणार आहे. भारतीय स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) अल्पभूधारक शेतकरी, शेत मजूर यांना शेत जमीन विकत घेण्यासाठी कर्ज (Loan) देणार आहे. हे कर्ज लँड परचेज स्कीम (Land Purchase Scheme /LPS) या योजने अंतर्गत मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजने बद्दल.(Land Purchase Scheme in Marathi)…

लँड परचेज स्कीम. (Land Purchase Scheme)

लँड परचेज स्कीम ही योजना अल्पभूधारक व मजूरांना शेत जमीन विकत घेण्यास मदत करते. या योजने अंतर्गत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना शेत जमीन विकत घेण्यासाठी 85% कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर बँकेकडून शेत जमीनीचे मूल्यांकन केले जाते. त्यानंतर 85% कर्ज दिले जाते. हे कर्ज परत करे पर्यंत शेत जमीन बँकेकडे गहाण असेल. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 7 ते 10 वर्षांचा कालवधी दिला जाऊ शकतो.

लँड परचेज स्कीम या योजनेचा लाभ कोन घेऊ शकतो व त्यासाठी पात्रता

* अल्पभुधारक शेतकरी ज्यांच्याकडे 5 एकर कोरडवाहू शेत जमीन आहे किंवा त्यापेक्षाही कमी शेत जमीन आहे.
* जर शेतकऱ्याकडे बागायती शेत जमीन असेल आणि ती 2.5 एकर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर असे शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र आहे.
* शेतीमध्ये काम करणारे भूमिहीन मजूर देखील या योजनेचा लाभ घेऊन शेत जमीन विकत घेऊ शकतात.
* या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावे कमीत कमी 2 वर्षाचा कर्ज परतफेडीचा रिकॉर्ड असायला हवा.
* अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावे इतर बँकेचे कर्ज थकीत नसावे.

या योजनेसाठी Apply कसे कराल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळील भारतीय स्टेट बैंक ऑफ़ इंडियाला (SBI) भेट द्या आणि ब्रांच मैनेजर यांच्याकडे चौकशी करा.

12 thoughts on “अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन मजूर घेऊ शकणार शेत जमीन विकत, SBI करणार मदत..!”

 1. I had tried and ask number of nationalized bank including SBI and PNB but managers do not accept this that they have any scheme like this.
  If there is any other process please let us know

  Reply
  • माननीय, सर जी मला शेती
   घ्यायची आहे , मि भूमिहीन
   आहे, तर कुठे जावे लागेल.
   आणि काय करावे लागेल
   बँक वाले तर देते किवा नाही
   तर माहीत
   नाही…

   Reply
 2. यावर बँक किती टक्यानी कर्ज देईल.
  What is loan interest percentage on this skim

  Reply
 3. भूमिहीन कुटूंबासाठी किती मिलेल कृपया माहिती दियावी

  Reply
 4. हि योजना गरीबाची निव्वळ फसवणुकीची वाटते. महाराष्ट्रात शेतजमीन विकत घेण्यासाठी खरेदीदार हा शेतकरी असला पाहीजे असा नियम आहे. मग भुमीहीन व्यक्ती कसा विकत घेऊ शकेल,

  Reply
 5. किती रुपया प्रयंत मिळणार त्याचे व्याज दर किती हे कळावे

  Reply

Leave a Comment