नवीन घर घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होईल नुकसान, पहा बातमी..!

Home buying Tips : कोणतीही मालमत्ता खरेदी करत असताना सर्वात प्रथम आपण किती पैसे उभे करू शकतो याचा अंदाज नक्कीच लावावा. खरेदी करत असताना नक्की किती रक्कम वापरणार आहात? हितचिंतकांच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून कर्ज (Home loan) घेणार आहात का? या गोष्टीचा सर्रासपणे विचार करावा. जर सगळे पैसे तुमचे स्वतःचे असतील तर चिंता करायची गरज नाही. परंतु कर्ज घेऊन एखादी गोष्ट खरेदी करणार असाल तर मासिक खर्चानुसार तसेच काळानुसार वाढत जाणारा खर्च या गोष्टीचा विचार करावा.

उदाहरणार्थ, जर आपण अविवाहित असाल तर अशावेळी विवाह नंतर वाढणारा खर्च, तसेच शिक्षण खर्च, पाल्यांचा खर्च, इत्यादी गोष्टींचा अशावेळी विचार करावा आणि निर्णय घ्यावा. जर आपला जोडीदार नोकरदार असेल किंवा व्यवसायिक असेल तर अशावेळी घराचे बजेट अगदी बिनधास्तपणे वाढवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक अडचणीच्या कालखंडामध्ये जोडीदाराचे उत्पन्न फारच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

स्थान आणि रहाणीमानाच्या खर्चाचे नियोजन :

ज्या ठिकाणी आपण घर खरेदी करणार आहात. तेथील राहाणीमान तसेच परिसर याची पाहाणी करावी. नव्याने विकसित होणारे ठिकाणी आपण बघितले तर अगदी कमी किमतीत घर मिळते अशा भ्रमामध्ये असाल तर नक्कीच तुमचे पैसे जास्त जातील. कारण की त्या ठिकाणी घर फक्त स्वस्त मिळते परंतु लिविंग कॉस्ट या ठिकाणी अधिक असण्याची शक्यता असते. लिविंग कॉस्ट म्हणजे आपला दैनंदिन खर्च. (Home buying Tips for first time buyers)

एकच क्षेत्रामध्ये विकसित होणाऱ्या विविध कॉलनी मध्ये राहणीमानावरचा जो काही खर्च असेल तो वेगवेगळा राहू शकतो. त्याच प्रमाणे सुरक्षा, मोकळेपणा, साफसफाई, घराची बांधणी, वनराई, पार्किंग अशा विविध सुविधांच्या माध्यमातून लिविंग कॉस्ट चांगलीच वाढते. तसेच ज्या विभागात महागडी घरे असतात तेथील परिसरात सुद्धा लिविंग कॉस्ट जास्तच असते.

आनंदाची बातमी! आता म्हाडा’ला या जिल्ह्यांमध्ये घरे बांधणे होणार सोपे; येथे क्लिक करून पहा कोणत्या जिल्ह्यात उपलब्ध होणार स्वस्त घरे ?

गुन्हेगारी भागापासून दूर राहिलेले चांगले :

प्रत्येक शहरांमधील काही विशिष्ट भागांमध्ये टवाळखोर गुंड लोकांचे वास्तव असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जागा किंवा घर खरेदी करत असताना ज्या त्या विभागातील गुन्हेगारी घटकांची तितकीच माहिती घ्यावी. दिल्लीमधील एनसीआर भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण वेगवेगळे राहू शकते (Home buying Tips in a sellers market). तसेच अन्य शहरात सुद्धा असाच अनुभव येण्याची शक्यता आहे. अशावेळी विकासकांची चर्चा करत असताना या गोष्टीवर नक्कीच विचार केला पाहिजे आणि आपण स्वतःही याविषयी माहिती काढली पाहिजे. या बाबींकडे लक्ष देणे आपल्या फायद्याचे ठरू शकते.

रोजगार आणि भवितव्य :

कामकाजाचे ठिकाण जवळपास असेल तर ते नक्कीच फायद्याचे ठरेल. कारखाने इतर कंपन्या जवळ असणाऱ्या विभागांमध्ये घरांची मागणी जास्त असते. इतकेच नव्हे तर आपल्या घराजवळ काम मिळाले असेल किंवा नोकरीचे ठिकाण एकदम जवळ असेल तर प्रवास करण्यासाठी तितका वेळ लागत नाही. मागील दोन-तीन दशकांपासून नोएडा, गुडगाव, बेंगलोर, पुणे शहरांमध्ये घरांची मागणी याच कारणामुळे वाढली आहे. त्यामुळे ज्या शहरी भागामध्ये आपल्याला स्वतःचे घर खरेदी करायचे आहे त्या भागाचा नक्कीच भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करावा. तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा जवळपास सिनेमा, बागीच्या, मॉल, मेट्रो, बस स्थानक इत्यादी सार्वजनिक सेवेची केंद्र असतील तर ती नक्कीच फायद्याची ठरू शकतात.

होम लोन घेत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा! अन्यथा होईल मोठे नुकसान, येथे क्लिक करून पहा बातमी..

थ्री बीएचकेची वाढती मागणी (3 bhk flat Mumbai)

मागील तीन वर्षांमधील रियल इस्टेटच्या बाजाराचे या ठिकाणी आकलन केले असेल तर महानगरांसोबत दुसऱ्या श्रेणी मधील शहरांमध्ये थ्री बीएचके घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रामुख्याने पाहता कोरोना कालावधीनंतर नागरिकांच्या मनामध्ये मोठे घर घेण्याची इच्छा तितकीच वाढली (Smart home buying tips). दोन किंवा तीन बेडरूम सोबतच सव्हेट रूम असणाऱ्या घरांना या ठिकाणी प्राधान्य दिले जात आहे. अलीकडे वर्क फ्रॉम होमचा वाढता ट्रेंड बघितला तर अशा घरांची मागणी चांगलीच वाढली आहे.

भविष्यातील गरजा :

सध्याच्या काळामध्ये आपण बघितले तर वन बीएचके किंवा वन रूम किचन खरेदी करायची या ठिकाणी शक्यता वाटत असेल तर भविष्यात या ठिकाणी आपल्याला मोठ्या घराची अजिबात गरज वाटत नाही असे समजू नका. म्हणूनच घर खरेदी करत असताना भविष्यामधील गरजांवर देखील तितकेच लक्ष द्यावे. कारण आपल्या फॅमिली मध्ये आपण, तसेच आई-वडील, आपला जोडीदार, आपली मुले इतके मेंबर असतील तर वन बीएचके घेण्याचा विचार नक्कीच टाळावा. अशा वेळी तुम्ही टू बीएचके अगदी बिनधास्तपणे घेऊ शकता.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

पायाभूत सुविधा :

घर खरेदी करत असताना पायाभूत सुविधांची उपलब्धता देखील तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे सुंदर रस्ते असावेत. तसेच वाहतूक कोंडीच्या काळामध्ये पर्यायी रस्ता देखील असावा. सांडपाण्याची व्यवस्थापन असावे. तसेच शाळा, कॉलेज, वीजपुरवठा इत्यादी सुविधा असावेत. या सर्व गोष्टींची उपलब्धता असेल तर आपल्याला भविष्यासाठी कोणती चिंता करायची गरज नाही. या विविध गोष्टींचा विचार केल्यानंतर घर खरेदी केले तर दीर्घकाळपर्यंत आपल्याला हे घर अजिबात बदलण्याची गरज भासणार नाही आणि जो आहे तो विभाग सोडून जाण्याची सुद्धा इच्छा होणार नाही.

Leave a Comment