बाप रे! धक्कादायक व्हिडिओ; सोयाबीनच्या एका झाडावर डझनभर गोगलगायी, रात्रीतून पिकं करतायत उध्वस्त, पहा व्हिडिओ..!

Snail Issue Farmers : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झालेला आहे. अधून- मधून पडत असलेल्या पावसावर देखील सोयाबीनचे पीक जोमात वाढले आहेत. पण, सध्या सोयाबीन पिकावर एक मोठी समस्या आली आहे, त्यामूळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. सोयाबीनवर रात्रीच्या वेळी अचानकपणे गोगलगायी हल्ला करताना दिसत आहे. एका झाडावर तब्बल डझनभर गोगलगायी हल्ला करत असल्याने पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान घडून येताना दिसत आहे. आधीच पुरेसा पाऊस झालेला नाही आणि त्यातच आता गोगलगायीच्या अशा हल्ल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गोगलगाय पिकावर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ खाली देण्यात आलेला आहे..

औरंगाबाद तालुक्यात असलेल्या रामवाडीमधील सोयाबीनच्या पिकावर (Soybean Crop) गोगलगायींनी मोठा हल्ला चढवला आहे. शेबी गोगलगायीच्या हल्ल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या गोगलगायी एका रात्रीतून सोयाबीनचे पीक उध्वस्त करत आहे. त्यामुळे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

येथे वाचा – खुशखबर! आता मिळवा लोन वर ऑफर, पहा या बँकेत मिळत आहे ही खास ऑफर..!

यंदा पुरेसा पाऊस पडत नसल्याने पिकं जळू लागली आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचं सोयाबीन गोगलगाय नष्ट करत असल्यानं शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट घोंघावत आहे. त्यामुळे, आता शासनाने गोगलगायीनी नुकसान केलेल्या सोयाबीनचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

येथे वाचा – शेणखतापासून शेतकरी बनत आहे लखपती, पहा काय आहे ही ट्रिक..!

पहा चिंता वाढवणारा व्हिडीओ 

गोगलगायी सोयाबीन वर रात्रीच्या वेळी हल्ला करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका सोयाबीनच्या झाडावर डझनभर गोगलगायींनी हल्ला चढवलेला दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सर्वच झाडांवर तेवढ्याच गोगलगायी असल्याने सोयाबीन पिकाचे होत्याचे नव्हते झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या गोगलगायी नेमक्या आल्या कोठून? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे, अनेक उपाययोजना करून देखील या गोगलगायींवर नियंत्रण मिळवता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अजून पर्यंत कृषी विभागाकडून यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसून, शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप शेतकरी वर्ग करत आहेत. 

Leave a Comment