लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड, स्टील चिटकत असल्याचा काहींचा दावा, पहा काय आहे सत्य..!

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी आता लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं दिसतय. लॉकडाउनमुळे रोज मजूरीवर काम करणाऱ्या लोकांचे खुप हाल होत असल्यामुळे शासन आणि प्रशासन लॉकडाउन हटवून लसीकरनावर जास्त भर देत आहे. सोशल माध्यमांवर पसरलेल्या काही अफवांमुळे सुरवातीला नागरिकांचा खुप कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला. पण दुसऱ्या लाठे मध्ये कोराना संसर्गामुळे खुप जणांचे प्राण गेले त्यामुळे कोरोनाच्या भीतीने लस घेणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढली. पण लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड, स्टील चिटकत असल्याचा काहींच्या दाव्यांमुळे नागरिकांमध्ये लसीकरणा बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

नाशिक शहरात राहणारे अरविंद सोनार यामुळे चांगलेच चर्चेत राहिले. अरविंद सोनार यांनी आपल्या शरीरात चुंबकत्व निर्माण झाल्याचे माध्यमांना माहिती दिली. दिवसभर चर्चेत असलेल्या या बातमीमुळे नागरिक सोनार यांच्या घरी येत होते. विविध माध्यमांनी देखील सत्य समजून घेण्यासाठी त्यांच्या घरी गर्दी केली होती. शरीरात निर्माण झालेल्या या चुंबकत्वामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे त्यांनी सांगितले. लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात टॉनिक संचारल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या वैद्यकीय पथकानेही त्यांच्या घरी जाऊन त्यांची वैद्यकिय तपासणी केली. ज्या खासगी रुग्णालयात सोनार यांनी डोस घेतला होता त्या रुग्णालयात लसीच्या उत्पादन बॅच नंबरवरून दुसर्या व्यक्तींवर याचा काही परिणाम झाला का? याची चौकशी होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. दुसरीकडे वैद्यकिय शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने यांनी या प्रकाराची नोंद घेत यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

वैद्यकिय शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने यांची प्रतिक्रिया
लसीचा डोस आणि स्टिल शरीराला चिकटण्याचा काहीही संबंध नाही. आजवर कोट्यवधींच्या संख्येत कोविशिल्डचे डोस दिले गेले आहेत. परंतु असा अनुभव आलेला नाही. संबंधितांना लोखंड चिकटत असते तर चुंबकत्वाच्या बाबतीत विचार होऊ शकला असता. परंतु स्टिलसह अन्य धातूही चिटकत असल्याने त्यांना त्वचेचा विकार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल किंवा डॉ. वसंतराव पवार हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करुन घ्यावी. घामामुळे वस्तू चिटकत असाव्यात.
– डाॅ. तात्याराव लहाने, वैद्यकिय शिक्षण संचालक

लोखंड, स्टील चिटकवण्याचे प्रयोग
या बातम्या सोशल माध्यमांवर झळकल्यानंतर लस घेतलेल्या नागरिकांनी लोखंडी वस्तू, स्टील, नाणी आणि चमचे आपल्या शरीरावर चिटकवण्याचे प्रयोग केले. ज्यांच्या सोबत हे धातू चिटकण्याचे प्रकार घडले त्यांनी माध्यमांना माहिती दिली.

छत्तीसगड मध्ये देखील एका महिलेचा दावा
छत्तीसगड मधील सुनिता फडणवीस (नगरसेविका) यांनी देखील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचा दावा केला. या प्रकरणाचा वीडियो बनवून त्यांनी डाॅक्टरांना पाठवला. हे सर्व लसीमुळे झाले असेल असं सांगता येणार नाही असं ते म्हणाले. त्या महिलेच्या हाताला नाणी व स्टीलच्या वस्तू चिकटल्या. पण मात्र ही नवीन गोष्ट नाही, खूप आधीपासून असे घडत आहे. शरीराची रचना त्वचेच्या रचनेवर आधारित असते, मोठ्या प्रमाणात लोकांच्या त्वचे वर केस नसतात. घामामुळे त्वचेवर मिठाचे प्रमाण जास्त असते. शरीर लहान कणांपासून बनलेले असते, त्यात अर्धवट विद्युत चुंबकीय शक्ती देखील असते. त्याच बरोबर, कृत्रिम कपडे घालण्यामुळे घर्षण होते, ज्यामुळे त्वचेमध्ये चुंबकीय शक्ती तयार होते असं जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. बी. एल. कुमरे यांनी सांगितले.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment