आजचे ताजे (Live) सोयाबीन बाजार भाव | Soybean Bajar Bhav 21-02-2022 Monday
सर्व शेतकरी मित्रांना Read Marathi तर्फे नमस्कार, आज या लेखात आपन बघणार आहोत आजचे बाजार समिती नुसार सोयाबीन (Soybean) बाजार भाव… सोयाबीनची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला? त्या सोबतच बघणार आहोत राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला आहे? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत.(Live Soybean Bajar Bhav)…
चला तर मग जाणून घेऊया आजचे (21 फेब्रुवारीचे) बाजार समिती नुसार सोयाबीन बाजार भाव (Market Committee wise Soybean Rate)…
बर्याच शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीनला 7 हजारांच्या पुढे दर मिळेल या हेतूने साठवणूक करून ठेवलेली आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे सोयाबीनची मागणी येत्या काळात अजून वाढेल आणि सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा काही अभ्यासू शेतकर्यांना वाटत आहे. आजच्या ताज्या सोयाबीन दरांचा, देशांतर्गत मागणीचा आणि आंतरराष्ट्रीय सोयाबीन उत्पादनाचा जर विचार केला तर सोयाबीनचे दर लवकरच 7 हजार पार करतील असं दिसतय. आज राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सात हजाराच्या जवळपास दर मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया आज 4 वाजेपर्यंत सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला?
शेतमालाचे बाजार भाव आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

आज वर्धा जिल्ह्यातील पुलगाव बाजार समितीत 7 हजाराच्या जवळपास दर मिळाला, (पुलगाव, आवक – 90 क्विंटल) येथे मिळालेला जास्तीत जास्त दर 6910 रुपये आहे तर कमीत कमी दर 5900 आणि सर्वसाधारण दर 6400 रुपये मिळाला..
त्याखालोखाल हिंगोली, वाशीम आणि आर्णी (यवतमाळ) या बाजार समित्यांमध्ये देखील साडे सहा हजाराच्या पुढे दर मिळाला…
आजचे सर्व बाजार समिती नुसार सोयाबीन बाजार भाव (Market Committee wise Soybean Rate) पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद