सोयाबीनची बीज प्रक्रिया अशा पद्धतीने करून भरघोस उत्पादन मिळवा..!

सोयाबीन बीज प्रक्रिया संपूर्ण माहिती | Soybean Bij Prakriya information

Read Marathi Online : अलीकडे बीज प्रक्रियेला खूप महत्व प्राप्त झाले आहे. ते म्हणतात ना “शुद्ध बिजा पोटी, फळे रसाळ गोमटी” त्यामुळे पेरले जाणारे ‘बी’ चांगल्या प्रतीचे असायला हवे. पण बी जरी शुद्ध असले तरी कीड आणि रोग उगणाऱ्या झाडाला ग्रासून टाकतात. त्यामुळे झाडाला जन्मतःच जर मजबूत करायचे असेल तर बीज प्रक्रिया ही केलीच गेली पाहिजे…

सोयाबीन या पिकाला खोड कीड आणि चक्री भुंगा या दोन किडींचा खुप जास्त प्रमाणात धोका असतो. खोड कीड आणि चक्री भुंगा या किडीमुळे सोयाबीन पिकाचे 40-60% नुकसान होते, त्या मुळे सोयाबीन पिकाला होणाऱ्या भविष्यातील किडींचा धोका टाळण्यासाठी आणि बियाण्यांमध्ये असलेले रोग रोखण्यासाठी बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकाला बीज प्रक्रिया कशी आणि काय करावी हे बघणार आहोत.

येथे वाचा  – सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!

सोयाबीन बीज प्रक्रिया करण्याची पद्धत | Soybean Bij Prakriya Kashi Karavi 

सर्व प्रथम एखाद्या ताड पत्रीवर आपल्या क्षेत्रावर बियाणे पसरवून घ्यावे त्या नंतर Thiram हे बुरशीनाशक घेऊन प्रति किलो बियाण्यास 3 gm किंवा Carbendazim +Mancozeb 3 gm या प्रमाणे चोळावे. यामुळे जमिनीतील बुरशी नष्ट होतात. हे चोळुन झाल्यानंतर
Thimethoxam 30% FS हे कीटकनाशक घेऊन प्रति किलो बियाण्यास 3 ते 4 ml अधिक त्यात 3 ते 4 ml पाणी मिसळून ताड पत्रिवरील बियाण्यास पसरवून व्यवस्थित सर्व बियांना सम प्रमाणात लागेल याची काळजी घेऊन हळुवार चोळावे जेणे करून सोयाबीनचे आवरण खराब होणार नाही. त्यानंतर बियाने सावलीत चांगल्या प्रकारे वाळवून घ्यावे.

येथे वाचा  – सोयाबीन, कापसाच्या हमीभावात वाढ, जाणून घ्या यंदा काय मिळणार हमीभाव..!

बीज प्रक्रियेचे फायदे

1) बीज प्रक्रियेमुळे किड व रोगांची प्राथमिक अवस्था नष्ट होते
2) बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.
3) जमिनीतून आणि बियाण्यातून प्रसारित होणाऱ्या
बुरशी जन्य रोगांना प्रतिबंध होतो.
4) लागवडी पासून 25 ते 30 दिवसांपर्यंत पिकांचे रसशोषक किडी आणि इतर किडींपासून संरक्षण होते.
5) रोग व किडींचे प्रमाण कमी झाल्या मुळे नक्कीच उत्पादनात 10 ते 20 टक्यांनी वाढ होते.

हे सर्व फायदे लक्षात घेऊन सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया केलीच पाहिजे.