आता सोयाबीन मध्ये तेजी की मंदी? पहा काय आहे तज्ञांचं मत..!

सर्व शेतकरी बांधवांचे शेती विषयक माहिती देणार्‍या आपल्या Read Marathi न्यूज वेबसाइट वर खुप खुप स्वागत.

सोयाबीनचा हंगाम आता अंतीम टप्प्यात वाटचाल करत आहे. काही शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील सोयाबीन व उन्हाळी हंगामातील सोयाबीन सोबतच विकणार असल्याचं सांगितलं आहे, त्यामूळे शेतकरी बांधव बाजारावर विशेष लक्ष देऊन आहे. आता पुढे बाजार कोणती दिशा घेणार? हे या शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचं आहे.(Soybean boom or bust? What is the opinion of experts?)

येणारा काळ सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण आतापर्यंत स्वत: शेतकरी बांधवांनी बाजाराच नियंत्रण आपल्या हाती ठेवलं होतं, टप्प्याटप्प्याने आपलं सोयाबीन विकून चांगला दरही मिळवला होता, आता यापुढे देखील असच टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारात आणून शेतकरी बाजारावर नियंत्रण ठेवणार का? हे पाहण खूप महत्वाचं आहे. कारण आता अलीकडेच मोहरीचे पीक बाजारात येऊ लागले आहे त्यासोबतच उन्हाळी सोयाबीन पण लवकरच बाजारात मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात बदल होईल का? असा प्रश्न शेतकर्‍यांचा आहे.

हे पण वाचा

काही तज्ञांच्या मते मोहरीचे व उन्हाळी सोयाबीनच्या आगमनाने सोयाबीन बाजारात काही दिवसांसाठी थोडी मंदी दिसू शकते असा अंदाज आहे. बाजारात ही परिस्थिती 2 ते 3 आठवड्यापर्यंत दिसून येईल पण पुन्हा सोयाबीन मोठ्या तेजीच्या दिशेने वाटचाल करेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

बाजारात येणारे मोहरीचे उत्पादन खाद्य तेलाचा तुटवडा भरून काढेल एवढे नाही अस काही तज्ञांचं मत आहे, त्यामूळे देशांतर्गत सोयाबीनला मागणी वाढत आहे. आणि विशेष म्हणजे जागतिक स्तरावर सोयाबीन उत्पादनाचा आकडा कमी असल्यामूळे जागतिक स्तरावर सोयाबीनची डिमांड ही अधिकच आहे त्यामूळे सोयाबीन भाव थोड्याच दिवसात तेजीतच दिसेल असा इशारा काही तज्ञांनी दिला आहे.

सोयाबीन बाजाराबाबत ताज्या अपडेट्स आम्ही नेहमीच तुमच्या पर्यंत घेऊन येत असतो, हे अपडेट्स तुमच्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

महत्वाची सुचना : शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याचा किंवा साठवून ठेवण्याचा निर्णय स्वतः बाजाराचा अभ्यास करून घ्यावा.. धन्यवाद…

3 thoughts on “आता सोयाबीन मध्ये तेजी की मंदी? पहा काय आहे तज्ञांचं मत..!”

  1. सोयाबीन भावामध्ये तेजी केव्हा येईल ते सांगा …आणि किती भाव भेटलं तेव्हा ते पण सांगा….

    Reply

Leave a Comment