शेतकर्यांनो! घाबरू नका; सोयाबीन पिकाला पाण्याचा फटका पण कृषी विभागाचा हा सल्ला महत्वाचा..!
शेतकरी मित्रांनो, यंदा सर्वत्र पेरण्या थोड्या उशीरा झाल्या कारण जून संपेपर्यंत पावसाने पाठ फिरवली होती. सोयाबीनचे पीक उशीरा जरी पेरले तरी सोयाबीन पिकाला काहीच फरक पडत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची निवड केली. जुलै महिना सुरू होत असताना राज्याच्या बर्याच भागात पावसाने हजेरी लावली आणि बळीराजाने मोकळा श्वास घेत पेरण्याच्या कामांना सुरुवात केली.
थोड्याच दिवसात पेरलेलं उगवून आलं मात्र पावसाने जोराचा धडाका सुरू केला. त्यामूळे उगवून आलेले सर्व सोयाबीन पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी शेत जमिनीवरील सुपीक माती वाहून गेली आहे. बर्याच दिवसांपासून सारखा पाऊस सुरू आहे. परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
मराठवाडा तसेच विदर्भ या भागातील बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकावर अवलंबून असतात. त्यामूळे या भागातील शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. परिणामी सोयाबीन पिवळी तर पडलीच पण अत्यंत पावसामुळे सोयाबीनच्या वाढीवर देखील परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. चांगल्या उत्पादनासाठी सोयाबीनची चांगली वाढ होणे आवश्यक असते. त्यासाठी आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काय करावे? कोणती कीटक नाशके फवारावी? याविषयी कृषी विभागाने महत्वाचा सल्ला दिला आहे.
येथे वाचा – बाप रे! सोयाबीन वर हा रोग असेल तर त्वरीत करा उपाय, नाहीतर उत्पादनात येईल मोठी घट..!
हा आहे कृषी विभागाचा सल्ला(Advice)
गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली नाही. त्यामुळे ही सोयाबीन पिके उगवण झाल्या झाल्या पाण्याखाली आल्याने नुकसान होत आहे. दोन दिवसांपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात थोडी उघडीप बघायला मिळत आहे. आता या वेळेत शेतकर्यांनी शेतात तुंबलेल्या पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतात चर खोदून तुंबलेले पाणी शेतातून बाहेर काढले तर सोयाबीन पिवळे होणार नाही. येत्या काळात अजून पाऊस झाला तरीही चारीद्वारे शेतातील पाणी निघून जाण्यास मदत होईल. शेतात वाफ झाल्यानंतर सुक्ष्म मुलद्रव्ये व रस शोषण करणाऱ्या किटकांसाठी फवारणी करणे आवश्यक आहे अशी माहिती लातूर मधील कृषी उपविभागीय अधिकारी कदम यांनी दिली आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; प्रचंड पावसात लष्करी अळीचा हल्ला, कीटक नाशकही झाले फेल, सोयाबीची वाढ थांबली..!
सोयाबीन, कांदा या पिकांवर भर देण्याचा सल्ला
यावर्षी पेरण्यांना उशीर झालेला असताना मागील 8 ते 10 दिवसांपासून पाऊस सारखा बरसत आहे. त्यामूळे ज्या ठिकाणच्या पेरण्या अडकल्या होत्या त्यांना आता फारच उशीर झालेला आहे. अशा परिस्थितीत कडधान्य पेरल्यानंतर उत्पादन घटते. त्यासाठी आता शेतकर्यांनी कांदा, सोयाबीन या पिकांवर भर द्यायला हवा असा सल्ला कृषी तज्ञ चांडक यांनी दिला…
शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा