सोयाबीनसाठी पहिली फवारणी ही घ्या, खोड माशी आणि चक्री भुंगा होईल गायब..!

शेअर करा

Read Marathi : सध्या सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली आहे. कोकण भागामध्ये तर पाऊस खूपच जास्त प्रमाणात होत आहे. जवळ जवळ सर्व महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश पेरण्या झालेल्या अथवा चालू आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात सोयाबीन उगवून आलेली आहे तर काही भागात पेरण्या अजून चालू आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण सोयाबीनची लागवड वाढलेली आहे.

महत्त्वाचं – सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर सोयाबीन पिकाचे 30 ते 40 टक्क्यांपर्यंत नुकसान करणारे कीड म्हणजे खोड माशी आणि चक्री भुंगा, या किडींचा नायनाट करणे गरजेचे आहे. या दोन कीड शेतकऱ्यांसाठी डोखे दुःखी ठरत आहे. जर या किडींचा बंदोबस्त पिकाच्या प्राथमिक अवस्थेत झाला नाही तर या नंतर आर्थिक नुकसानीची पातळी गाठतात. त्यामुळे या किडींचा सुरवातीलाच पहिल्या फवारणीच्या माध्यमातून कसा नायनाट करायचा ते आपण या लेखात बघणार आहोत.

सोयाबीन लागवडी नंतर पहिले 25 दिवस खूप महत्वाचे असतात. कारण या खोड माशीचा प्रादुर्भाव पहिल्या 10 ते 25 दिवसांमध्ये जास्त दिसून येतो. त्यामुळे जर खोड माशीचा बंदोबस्त या अवस्थेत केला तर नक्कीच आपले उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी वाढेल.

येथे पहा आजचे सोयाबीन बाजार भाव

सोयाबीन मध्ये ही करा पहिली फवारणी

सोयाबीन लागवडी नंतर 10 ते 15 दिवसा दरम्यान सोयाबीन पीकावर खोड माशीसाठी
क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन 50% EC 
या कीटक नाशकाचा 15 लिटर पंपासाठी 25 ml त्यासोबतच पिकाच्या जोमदार वाढीसाठी 19:19:19 हे विद्राव्य खत प्रति पंप 50 gm या प्रमाणे फवारावे. वरील प्रमाण हे 15 लिटरच्या पंपासाठी आहे 20 लिटरच्या पंपासाठी पाण्याच्या प्रमाणात औषध घ्यावे. या मुळे सोयाबीनच्या प्राथमिक अवस्थेतील सर्व किडींचे नियंत्रण होण्यास मदत होईल.

येथे वाचा – सोयाबीन मधील तणाचा अशा पद्धतीने करा नायनाट, जाणून घ्या तणनाशक बद्दल माहिती..!

फवारणीचे चांगले रिजल्ट मिळवण्यासाठी ही काळजी घ्या..

शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्याला केलेल्या फवारणीचे अपेक्षित रिजल्ट दिसून येत नाही. त्या साठी खाली काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे त्या नक्की पाळा

1. फवारणीसाठी नेहमी स्वच्छ आणि विहिरीचे किंवा शेततळ्यातील स्वच्छ पाणीच वापरावे.
2. वापरल्या जाणाऱ्या पान्याच्या ph समायोजित केलेलं असावा.
3. फवारणी नेहमी सकाळी 11 वाजेच्या अगोदर आणि सायंकाळी 4 वाजेच्या नंतरच करावी.
4. फवारणी साठी चांगल्या प्रतीचे स्टिकर वापरावे ज्यामुळे पाण्याचा ph बरोबर होण्यास मदत होते.

येथे वाचा – कापूस लागवड करताय? मग हे तण नाशक फवारा आणि करा तणाचे व्यवस्थापन..!

शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..