बाप रे! सोयाबीन वर हा रोग असेल तर त्वरीत करा उपाय, नाहीतर उत्पादनात येईल मोठी घट..!

शेअर करा

ReadMarathi.Com : नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी सोयाबीनचा पेरा मागील वर्षी पेक्षा वाढलेला आहे. मागील हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने यावर्षी शेतकर्‍यांचा जास्तीचा कल सोयाबीनकडे आहे. त्यामूळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन मिळावे यासाठी पारंपरिक पद्धतीने पेरणी न करता BBF पद्धतीने, काहींनी 3.5 फूट बेड पाडून तर काही शेतकऱ्यांनी दोन सरीतील अंतर वाढवून पेरणी केली आहे.

यावर्षी पाऊस जर चांगला राहिला तर शेतकरी नक्कीच सोयाबीनचे विक्रमी उत्पादन मिळवणार आहे. तसेच यासाठी सोयाबीनचे अन्नद्रव्य व्यवस्थापन पण खूप महत्वाचे आहे. पण हे विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना काही गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे असते. सोयाबीन वरील रोगराई ओळखून वेळीच त्यासाठी आवश्यक त्या फवारण्या करणे गरजेचे असते.

सध्या बर्‍याच शेतकर्‍यांची सोयाबीन पिवळी पडायला सुरुवात झाली आहे. तर काही शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिवळी झाली आहे. सोयाबीन पिवळी पडल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता खूप असते. त्यामूळे शेतकरी बांधवांनी याकडे दुर्लक्ष करू नये. त्यासाठी या लेखामध्ये आपण सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे आणि यावर उपाय म्हणून कोणती फवारणी घ्यावी अशी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख लक्ष देऊन आणि शेवट पर्यंत नक्की वाचा..

येथे वाचा – सोयाबीन मध्ये 21 दिवसानंतर फवारा हे तण नाशक, एकही तण दिसणार नाही..!

सोयाबीन पिवळी का पडते?

(1) सोयाबीन पिवळी पडल्यानंतर बऱ्याच नवीन शेतकऱ्यांच्या मनात असा संभ्रम असतो की सोयाबीन वरती yellow mosaic व्हायरस आला की काय किंवा बुरशींची लागण झाली असेल असं त्यांना वाटतं असतं. पण असे नसून, हे अन्नद्रव्यांची कमतरतेमूळे होत असते. आपन पेरणी करते वेळी फक्त NPK खत टाकत असतो. पण वारंवार शेतामध्ये सोयाबीन हे एकच पीक घेतल्याने जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी झालेली असतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्यतः “लोह आणि झिंक” या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळी पडत असते. याचे व्यवस्थापन आपण पाहणार आहोत.

(2) जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास सोयाबीन पिवळी पडते

(3) सततचा आणि जास्त काळासाठी पाऊस पडल्यास सोयाबीन पिवळी पडते.

यावर असे करा उपाय

शेतात सोयाबीन पिवळी पडलेली दिसताच सोयाबीन वर लवकरात लवकर फवारणी घ्यायची आहे. फवारणी साठी चिलेटेड मिक्स-मायक्रोन्यूट्रिएंट(Chelated mix-Micronutrient) द्रव स्वरूपातील 1 ते 2 ml प्रति लिटर पाण्यासोबत… त्यासोबत बुरशी नाशक कार्बेन्डाझिम + मँन्कोझेब(Carbendazim + Mancozeb) 1 ते 2 gm प्रति लिटर पाण्यासोबत
आणि वाढीसाठी 19:19:19 हे खत 10 gm प्रति लिटर पाण्यासोबत फवारायचे आहे. या फवारणी नंतर 4 ते 5 दिवसात सोयाबीन वरील पिवळे पणा कमी होईल.

येथे वाचा – सोयाबीनसाठी पहिली फवारणी ही घ्या, खोड माशी आणि चक्री भुंगा होईल गायब..!

महत्वाचे : वरील सर्व रासायनिक औषधे, खते फवारण्यापूर्वी किंवा खरेदी करताना कृषी केंद्र चालकाचा किंवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे…