सोयाबीन भाव 10 हजार पार? ‘या’ दिवशी हा भाव मिळण्याची शक्यता, पहा त्यामागील कारण..!

मित्रांनो, सोयाबीन बाजार भावांबाबत रोज महत्वाच्या नव नवीन अपडेट आम्ही तुमच्या पर्यंत घेऊन येत आहोत. अलीकडे सोयाबीन बाजाराची चर्चा सर्वच ठिकाणी केली जात आहे. कारण येत्या काही दिवसात सोयाबीनला सोन्याचे दिवस येतील असा अंदाज सगळीकडे व्यक्त केला जात आहे.

सोयाबीनची जगातील एकूणच परिस्थिती पाहता सोयाबीनला 10 हजाराच्या पुढे भाव मिळण्याची दाट शक्यता आहे. हा भाव नेमका कधी पर्यंत मिळेल? आणि त्यामागे काय कारणे आहेत? याची माहिती आपण सविस्तर या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे.

रशिया – युक्रेन युद्धामूळे सोयाबीन भावाला गती मिळाली पण याव्यतिरिक्त अजून देखील काही कारणे समोर आली आहे जी सोयाबीन दर वाढीला पोषक ठरत आहे आणि ती कारणे आपल्याला माहिती असणं गरजेची आहे..

ब्राझील मध्ये सोयाबीन उत्पादन घटले

यावर्षी ब्राझील देशात सोयाबीनची स्थिती फारशी चांगली नाही. यंदा तेथे कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन उत्पादनाला याचा मोठा फटका बसला आहे. यावर्षी ब्राझील मध्ये सोयाबीन उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत 153 लाख टन इतके घटले असल्याचं जाणकार सांगत आहे. त्यामूळे जगाला मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पुरवठा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनचे उत्पादन कमी पडत असल्यामूळे हे देखील सोयाबीन दर वाढीसाठी एक कारण ठरत आहे.

रशिया-युक्रेन युद्धामूळे सोयाबीन बाजारात वाढ (Russia Ukraine war)

आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारावर रशिया-युक्रेनच्या युद्धाचा प्रभाव पडलेला आपण बघत आहोत. या देशातील शेतमाल आयात-निर्यातीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे.(Russia-Ukraine war)

जगामध्ये युक्रेन सर्वाधिक सूर्यफूल (Sunflower) उत्पादन करणारा देश आहे, युद्धामूळे या देशातून जगात सूर्यफूलाची आयात निर्यात ठप्प झाली आहे. यामूळे सूर्यफूल तेलाची टंचाई जगाला भासत आहे, परिणामी खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होऊन सोयाबीनचे दर वाढले आहेत. सूर्यफूल तेलाच्या तुटवड्यामूळे (Shortage) सोयाबीन तेलाची गरज निर्माण झाली आहे, यामुळे सोयाबीन दर अजून वाढतील असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे..

चीनसह इतर देशही करत आहे सोयाबीनची आयात

आता पर्यंत आपण बघितलं होतं की चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करत आहे. पण मित्रांनो फक्त चीन देशच आयात करत नसून अन्य देशही सोयाबीन आयात करत आहे.

तज्ञांच्या माहितीनुसार चीनने मागील आठवड्यात 10 लाख टन इतकी सोयाबीन आयात केली आहे पण त्याच काळात अमेरिकेने 106 लाख टन सोयाबीन जगामध्ये इतर देशांना निर्यात केल्याची माहिती हाती आली आहे. यावरून आपण अंदाजा लावू शकतो की एकटा चीन देश सोयाबीन आयात करत नसून जगातील बर्‍याच देशांनी सोयाबीनची आयात करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामूळे सोयाबीनला भरभराटी येण्याचे हे एक कारण ठरत आहे..

हे पण वाचा

‘या’ दिवशी 10 हजाराच्या पुढे भाव मिळण्याची शक्यता

मित्रांनो, सध्या सोयाबीन बाजार भाव स्थिर असल्याचं चित्र आहे. 6 हजार 900 ते 7 हजार 600 असा दर सोयाबीनला सध्या मिळत आहे. काही जाणकारांच्या मते मार्चच्या शेवटच्या हप्त्या पर्यंत असे स्थिर दर राहण्याची शक्यता आहे, पण हे दर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात किंवा मे महिन्यात 10 हजार देखील पार करू शकतात असा देखील अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

मित्रांनो, सोयाबीन बाजार भावात काही बदल झाल्यास तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येईल, त्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

महत्वाची सुचना : शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याचा किंवा साठवून ठेवण्याचा निर्णय स्वतः बाजाराचा अभ्यास करून घ्यावा.. धन्यवाद…

Leave a Comment