सर्व शेतकरी बांधवांच ReadMarathi.Com वर स्वागत आहे. मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण काही जागतीक बाजार अभ्यासक व भारतीय बाजार भाव अभ्यासकांच्या मते सोयाबीनला प्रचंड तेजी येणार असल्याची शक्यता आहे. सोयाबीनला तेजी येण्याचं नेमकं कारण काय आहे? ही तेजी कधी पर्यंत येण्याची शक्यता आहे? हे आपण पुढे बघणार आहोत.(Soybean prices will rise sharply, these are the reasons given by experts )
रशिया आणि युक्रेन युद्धामूळे सोयाबीन बाजारात तेजी येण्याची शक्यता
जागतीक बाजाराचा जर विचार केला तर सध्या जागतिक बाजारावर रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतोय. या देशांमध्ये होणार्या शेतमाल आयात-निर्यातीवर याचा परिणाम झालेला आहे. युक्रेन जगात सर्वाधिक सूर्यफूल उत्पादन करणारा देश आहे, युद्धामूळे या देशातून जगात सूर्यफूलाची आयात निर्यात होणार नाही यामूळे सूर्यफूल तेलाची टंचाई जगाला भासेल, याला पर्याय म्हणून सोयाबीन तेलाची गरज निर्माण होईल याचा परिणाम सोयाबीन बाजारावर होणार असून सोयाबीनची बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे, असं मत भारतीय व जागतीक बाजार भाव अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.
चीनच्या सोयाबीन आयात धोरणामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता
सोयाबीनचे भाव वाढण्यामागे चीनचा देखील वाटा असणार आहे, कारण चीन गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन मोठ्या प्रमाणात आयात करत आहे. चीन सोयाबीन मोठ्या प्रमाणात आयात करत असल्यामूळे जागतिक स्तरावर सोयाबीनचा मोठा तुटवडा भासू शकतो असं काही अभ्यासकांचं मत आहे. जागतिक स्तरावर तुटवडा निर्माण झाल्यानंतर सोयाबीनची मागणी वाढेल आणि तेव्हा सोयाबीन बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध असेल, त्यामूळे या सोयाबीनला प्रचंड दर मिळेल असं काही जाणकार व अभ्यासक यांच मत आहे..
हे पण वाचा
आजचे सोयाबीन बाजार भाव
सोयाबीनच्या दरांमध्ये तेजी केव्हा येईल?
मागील काही दिवसांपूर्वीचा जर विचार केला तर सोयाबीन बाजार भाव 6 हजारांवर स्थिर होते, तेव्हा शेतकरी बांधवांनी सोयाबीनची साठवणूक करण्यावर भर दिला होता. त्यामूळे बाजारात सोयाबीनची मागणी वाढली होती आणि आवक घटली होती, याचा परिणाम सोयाबीनच्या दरांवर होऊन आपल्याला तेजी बघायला मिळाली, आता 7 हजार 200 ते 7 हजार 400 या दरम्यान सोयाबीन स्थिर झाल्याचं बघायला मिळतय. काही जाणकारांच्या मते मार्च महिन्याच्या शेवटी सोयाबीनचा बाजार भाव 8 हजार बघायला मिळू शकतो, असा अंदाज जाणकार देत आहे तर काही जाणकारांच्या मते मे किंवा जून महिन्यांमध्ये सोयाबीन 10 हजार पार करू शकते असा अंदाज आहे..
शेती विषयक महत्वाच्या माहितीसाठी आमच्या WhatsApp आणि Telegram ला जॉईन व्हा
महत्वाची सुचना : शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याचा किंवा साठवून ठेवण्याचा निर्णय स्वतः बाजाराचा अभ्यास करून घ्यावा.. धन्यवाद..
Khup sundr mahiti dili ahe, dhanyawad