सोयाबीन बियाणे महागण्याची शक्यता, पहा किती रुपयांनी महागणार बियाणे..!

सोयाबीनचे पिक कमी मेहनतीचे आणि चांगले उत्पन्न देणारे असल्यामूळे दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा कल सोयाबीनकडे वाढत आहे. या हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळत असल्यामूळे येत्या खरिपातही सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होणार असल्याचा अंदाज वाटत आहे. लागवडीचे नियोजन म्हणून बर्‍याच शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणांचा शोध सुरू केला आहे. पण या वर्षी सोयाबीन बियाणे खरेदी करत असताना शेतकऱ्यांना थोडे जास्त पैसे मोजावे लागू शकतात. कारण यंदा सोयाबीन बियाण्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. (Soybean seeds are likely to become more expensive, see how much the seeds will cost)..

सध्या जवळपास शेतकऱ्यांचे शेतीची मशागतीची कामे आटोपत आली आहे आणि मे महिना अर्धा संपल्याने आता शेतकरी बियाणे खरेदीला लागणार आहे. तरी येत्या दोन ते तीन दिवसात बाजारामध्ये सोयाबीन बियाणे विक्रीला येणार आहे पण या वर्षी बियाण्यांचे दर प्रति बॅग 300 ते 400 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. प्रति किलो 15 ते 20 रुपये दर वाढतील असे कंपनी वितरक आणि किरकोळ बियाणे विक्रेते यांचे म्हणणे आहे.

येथे वाचा – कापूस उत्पादक शेतकरी होणार मालामाल, यंदाही कापसाचे भाव तेजीतच राहण्याची शक्यता..!

मे महिन्याच्या अर्ध्या नंतर बाजारात सोयाबीन बियाण्यांची उलाढाल वाढत असते. आता शेतकऱ्यांनी बियाने खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विक्रेत्यांमार्फत कंपन्यांकडे नोंदणी करून बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तरी 15 मे नंतर बाजारात बियाण्याचा पुरवठा सुरु होणार आहे. बियाण्यांसाठी उन्हाळ्यात घेतले जाणारे सोयाबीन यावर्षी व्यवस्थित पिकले नसल्याने बियाण्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गत वर्षी सोयाबीनच्या 30 किलो बॅग चे दर 2500 ते 2700 दरम्यान होते मात्र तेच दर या वर्षी 3000 ते 3400 दरम्यान असण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

1 thought on “सोयाबीन बियाणे महागण्याची शक्यता, पहा किती रुपयांनी महागणार बियाणे..!”

Leave a Comment