यंदा सोयाबीन पेरत असाल तर अशा पद्धतीने करा सोयाबीन मधील तणाचा नायनाट..!

Read Marathi Online : नमस्कार शेतकरी बंधूंनो, पाऊस सध्या शेतकऱ्या सोबत लपन-डाव खेळत आहे. अर्ध्याच्या वर जून महिना निघून गेला पण तरीही वरून राजाने शेतकऱ्याला सुखावले नाही. बळीराजा खूप आतुरतेने पावसाची ची वाट पाहत आहे. मान्सून ने जरी अवघ्या महाराष्ट्रात हजेरी लावली असली तरी पण अजून मान्सून च्या सरी कोसळल्या नाही. त्यात तापमान जैसे थे आहे. त्यामूळे गरमीने उकाडा देखील होत आहे.

बळीराजाने पेरणीची तयारी जवळपास केली आहे, आणि या वर्षी पण जास्तीत जास्त क्षेत्रावर सोयाबीन पेरली जाणार आहे. सोयाबीन पेरल्या नंतर शेतकऱ्याला चिंता ग्रस्त करणारी समस्या म्हणजे “तण”. जर तणाला वेळेवर नियंत्रित केले गेले नाही तर तण सोयाबीन उत्पादनाचे 20 ते 30 टक्के नुकसान करते. हे नुकसान टाळायचे असेल तर नक्कीच तणांचा वेळेवर बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

येथे वाचा  – सोयाबीनची बीज प्रक्रिया अशा पद्धतीने करून भरघोस उत्पादन मिळवा..!

तण दोन प्रकारे नियंत्रित करता येते, एक शेताची अंतर मशागत करून आणि मजुरांच्या साहाय्याने, दुसरे तण नाशकांचा वापर करून. तर या लेखात आपण तणनाशकांचा वापर करून कसे तण नियंत्रित करायचे ते बघणार आहोत.

सोयाबीन मध्ये फवारणी योग्य दोन प्रकारचे तण नाशक उपलब्ध आहे. उगवणी पूर्वी(Pre-Emergence) आणि उगवणी नंतर(Post-Emergence).

उगवण पूर्वी (Pre-Emergence)

हे तणनाशक पेरणी झाल्या झाल्या जमिनीत चांगली ओल असताना लागवडी नंतर 72 तासांच्या आत म्हणजे तीन दिवसांच्या आत फवारावे लागते. ते खालीलप्रमाणे..

(1) Pendamethalin 38.7% CS :
हे बाजारात वेगवेगळ्या व्यापारी नावाने उपलब्ध आहे. याचे एकरी प्रमाण 700 ml घ्यायचे आहे. लागवडी नंतर 72 तासांच्या आत फवारले तर चांगले परिणाम कारक आहे.

(2) Diclosulam 84% WDG :

हे बाजारात स्ट्रॉंग आर्म या नावाने मिळते. एकरी प्रमाण फक्त 12.4 gm आहे. याला लागवड झाल्या झाल्या 72 तासांच्या आत फवरल्यास याचे उत्तम परिणाम मिळतात. हे तणनाशक फवरल्या नंतर पुढील 30 दिवसांपर्यंत तणांना हे उगवू देत नाही.

येथे वाचा  – सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!

उगवणी नंतर (Post-Emergence)

या तणनाशकाची फवारणी लागवड झाल्यानंतर 15 ते 20 दिवसा नंतर करावी लागते.

(1) Imazethapyr 10% SL
याची फवारणी लागवडी नंतर 15  ते 20 दिवसांनी करता येते. प्रमाण 300 ml प्रति एकर.

(2) Imazamox 35% + Imazethapyra 35% WG

हे संयुक्त प्रकारचे तण नाशक आहे. हे लागवडी नंतर 15 ते 20 दिवसांनी फवारावे. एकरी प्रमाण  40 gm प्रति एकर घ्यावे…

तणनाशक फवारात असतांना घ्यायची काळजी –
– फवारणी साठी वापरले जाणारे पाणी स्वछ असावे गढूळ नसावे,
– जमिनीत पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी.
– फवारणी झालेल्या रानात जास्त वापरू नये.

3 thoughts on “यंदा सोयाबीन पेरत असाल तर अशा पद्धतीने करा सोयाबीन मधील तणाचा नायनाट..!”

  • उपयुकत माहिती मि या कामात नविन आहे मि आपना यापुढेहि फालो करित राहिण
   धन्यवाद

   Reply
 1. Hello,
  This is really a very important information for farmers, especially for people like me who is trying to do farming as a challenge and another source of income.
  I request you to give some information regarding what kind of seeds we can select if we go for SOYABIN.

  Reply

Leave a Comment