खुशखबर! आता एसटीने प्रवास करताना मिळवा ही नवीन सुविधा, आता ST प्रवासात मिळवा हा लाभ..!

ST Bus new Facility : राज्य सरकार एसटी प्रवाशांसाठी नेहमीच नवनवीन निर्णय घेत असते. गेल्या काही महिन्यापूर्वीच राज्य सरकारने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येत आहे. आता पुन्हा प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमूळे आता प्रवाशांना प्रवास करणे सोपे झाले आहे. ही खास सुविधा नेमकी कोणती आहे? आणि याचा लाभ कसा घेता येणार? याची माहिती जाणून घेऊ.

एसटीमध्ये तिकिटाचे पैसे देण्यासाठी आपल्याकडे कॅश पैसे तसेच सुटे पैसे असणे आवश्यक असते. बर्‍याचदा सुटे पैसे नसल्याने कंडक्टर आणि प्रवासी यांना तिकीट काढताना अडचणी निर्माण होतात. पण आता या नवीन सुविधेमूळे ही कटकट कायमचीच संपणार आहे. कारण आता प्रवाशांना एसटी बसमध्ये तिकिटाची पैसे ऑनलाइन भरता येणार आहे. हे पैसे तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करून भरता येणार आहे. अलीकडच्या काळात प्रतेक जण स्मार्ट फोन वापरत असल्यामुळे या सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा..

या सुविधेचा फायदा एसटी मंडळाला तर होणारच आहे त्यासोबतच प्रवाशांना देखील होणार आहे. सुट्ट्या पैशांचा ताण मिटणार आहे. प्रवास करताना काही प्रवाशांचे ‘मनी पॉकेट’ चोरीला जाते. त्यामुळे त्यांच्याकडे तिकीट काढण्यासाठी पैसे राहत नाही. पण आता या नवीन सुविधेमूळे मोबाईलच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहे. सध्या ही सुविधा एसटीच्या पुणे विभागामधील सर्व आगारांमधून धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये सुरू करण्यात आली आहे.

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

ऑनलाईन पैसे भरून देखील तिकिट मिळाले नाही तर काय कराल?

प्रवाशांसाठी हेल्पलाइन नंबर : ऑनलाइन तिकीट काढत असताना ऑनलाइन पैसे देऊन सुद्धा तिकीट न मिळाल्यास प्रवाशांना मदत मिळावी म्हणून महामंडळाकडून ‘400’ या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना 8800688006 या क्रमांकावर संपर्क साधून देखील मदत मिळवता येणार आहे.

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

Leave a Comment