राज्यात कडक लॉकडाउन? दोन दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता..!

मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. राज्यातील ही दुसरी लाठ खूप भयानक असल्याचं रुग्णांच्या आकडेवारी वरुन कळतय. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. उलट रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कडक लॉकडाउन संदर्भात दोन दिवसात निर्णय घेतील असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई मध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कडक लॉकडाउन संदर्भात माहिती दिली. रुग्णसंख्येने उंच पातळी गाठली आहे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लवकरच कडक लॉकडाउन संदर्भात निर्णय घेतील अशी माहिती मंत्री वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्ली सरकारने अलीकडेच दिल्ली मध्ये 6 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. तेथे अमंलबजावणी कशा प्रकारे होते? याची माहिती घेणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगीतले.

“संचारबंदीचा फायदा सध्या पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही.आपण लॉकडाउन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकानं असणारेही लॉकडाउन १०० टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाउनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अंदाज चुकवला आहे. सगळ्यांनाच वाटत होतं की ही दुसरी लाट सौम्य असेल, पण ती तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नव्हती, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

पुढे बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले की राज्य सरकारने साडे पाच हजार कोटी राखीव ठेवले आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी रेमडेसिवीर, ऑक्सिजन प्लांट आणि आरोग्य विभाग बळकट करण्यासाठी 3300 कोटी आणि आमदारांच्या निधीतून 1 कोटी खर्च करायचा आहे. याशिवाय इतर स्त्रोतही आहेत,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment