ठाण्यात टू-बीएचके घरांची जोरदार खरेदी; या भागाला लोकांची विशेष पसंती, पहा कामाची बातमी..!

2 bhk flat in Thane : ठाणे शहरात दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून जवळपास 3200 पेक्षा जास्त घरांची विक्रमी विक्री झाली आहे. आणि चक्क 2200 कोटी रुपयांचा व्यवहार एका दिवसामध्ये झाल्याची माहिती ठाणे एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्याकडून मिळाली आहे. यात सर्वाधिक वन आणि टू-बीएचके (2 bhk flat in Thane) घरांना सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेला आहे.

यंदा नागरिकांनी मागील काही वर्षांच्या तुलनेत सर्वात जास्त पसंती टू-बीएचके घरांना दिली असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार झाले आहे. ठाणे शहरात मोठ्या वेगाने गृहप्रकल्पांची (Housing Project in Thane) कामे सुरू असून अनेक टोलेजंग इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. शहरात 70 ते 75 पेक्षा जास्त उंचीच्या टॉवर्स उभारले जात असून अनेकमजली इमारतींच्या गृहसंकुलांचेही प्रमाण वाढत आहे.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, मिळतील या सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

ठाण्यातील या भागात टू-बीएचके घरांची जोरदार खरेदी (2 bhk flat in Thane)

ठाण्यातील घोडबंदर भागात असलेल्या चांगल्या सुविधांमुळे नागरिकांकडून या भागामध्ये घरे खरेदीसाठी सर्वात जास्त प्रतिसाद दिला जात आहे. नागरिकांनी एक कोटींपर्यंतच्या वन आणि टू-बीएचकेच्या घरांना जास्त प्रतिसाद दिला असून घोडबंदर परिसरामध्ये सर्वात जास्त खरेदी व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुंबईत ऑफर्सचा धमाका! फक्त 10 टक्के रक्कम भरून घेता येणार घर, पहा बातमी..!

यावर्षी घर खरेदी वाढावी यासाठी बांधकाम व्यवसायिकांकडून आकर्षक ऑफर्सची घोषणा करण्यात आली होती. ज्यात शून्य स्टॅम्प ड्युटीच्या ऑफर्सचा देखील समावेश होता. तसेच आगामी काळात ठाणे शहरातील पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांची देखील जाहिरात बांधकाम व्यवसायिकांकडून करण्यात आल्या होत्या.

घोडबंदर तसेच शिळफाटा परिसरात देखील दाखल होत असलेल्या गृहप्रकल्पांनी जास्तीत जास्त खरेदीदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली शहरांच्या मध्यावर्ती असलेल्या या भागात देखील अनेक बड्या बांधकाम व्यवसायिकांचे गृहप्रकल्प (Housing Project) सुरू असून त्यामध्ये देखील घरांची मोठी बुकिंग (Flat Booking) झाली.

खुशखबर! आता घर खरेदी करा आणि मिळवा ‘हे’ फायदे..ही चांगली संधी गमावू नका..

मुंबईच्या पश्चिम उपनगराकडे जाण्याकरिता सोयीच्या असणार्‍या घोडबंदर भागामध्ये मोठी घर विक्री (Flat selling) झाली असून अनेक सुखसोयींनी युक्त तसेच निसर्ग संपन्न परिसराची देखील भुरळ घर खरेदी करणार्‍यांना पडल्याचे असं बांधकाम व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

म्हाडाची घरे झाली स्वस्त! म्हाडा प्राधिकरणाने घेतला मोठा निर्णय..आता घराचे स्वप्न होईल साकार..

Leave a Comment