तेजस्वी यादवचा बॉलिवूड वर हल्लाबोल..!

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक राज्यांचा आर्थिक व सामाजिक कणा मुडला आहे. रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे खुप हाल होत आहे. आॅक्सिजनच्या अभावामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील राजकीय नेते एकमेकांवर चांगलेच बरसले आहे. दरम्यान आता बॉलिवूडवरही टीका होतांना दिसत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बॉलिवूड मधील कलाकारांना चांगलेच झापले आहे. प्रिय भित्र्या भारतीय सेलिब्रिटींनो, असं म्हणत तेजस्वी यादव यांनी बॉलिवूडवर निशाना साधला आहे.

देशातील सध्याच्या परिस्थितीवर विदेशातील सेलिब्रिटी असो किंवा नेते मंडळी यांनी चिंता व्यक्त करत आपआपली मते मांडली आहे. आज या बिकट परिस्थितीत भारतीय सेलिब्रिटींनी मौन पाळला असल्यामुळे तेजस्वी यादव बॉलिवूडवर चांगलेच बरसले. भारतातील बिघडलेल्या परिस्थितीवर देश विदेशातून चिंता व्यक्त केली जात असतांना केंद्र सरकारवरही टीका केली जात आहे. “तुमच्यासाठी आदर्श असलेल्या लोकांच्या प्राथमिकतेमुळे आॅक्सिजन व औषधांच्या तुटवड्यामुळे देश बांधव प्रतेक सेकंदाला मरत आहे. कुठे आहे तुमचा विवेक? कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा? देशाशी प्रामाणिक रहा, सरकारशी नाही”. असं बोलत त्यांनी सेलिब्रिटींवर हल्लाबोल केला.

त्यावेळेस सेलिब्रिटींनी किसान आंदोलन भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं होतं...
ज्या वेळेस दिल्लीच्या सीमेवर किसान आंदोलन चालू होते त्या वेळेस विदेशातील नेते मडळीं आणि सेलिब्रिटींनी त्यावर मत व्यक्त केले होते. दरम्यान, भारतीय सेलिब्रिटींनी हा मुद्दा अंतर्गत असल्याच सांगितलं होतं. असही तेजस्वी यादव म्हणाले.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment