Telegram ने आनले एक भन्नाट फिचर; Whatsapp आणि Facebook ला देणार टक्कर..!

दिल्ली : खुप दिवसानंतर टेलीग्राम (Telegram) कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक जबरदस्त फिचर आणले आहे. यामुळे आता टेलीग्राम लवर्सना बर्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या या फिचरसाठी अन्य ऐप्प वर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. टेलीग्राम (Telegram) च्या या फिचरची चर्चा मागच्या वर्षी सुद्धा झाली होती पण कंपनीने या वर्षी हे फिचर लाॅच केले आहे. मोबाइल आणि कंप्यूटर वापर कर्त्यान्ना या फिचर चा फायदा होणार आहे. खुप मोठ्या कालावधीनंतर टेलीग्राम (Telegram) ने ग्रुप मध्ये व्हिडिओ कॉल करण्याची सर्विस लोकांना उपलबध करून दिली आहे. (Telegram launched a feature for Group Video call)

टेलीग्राम (Telegram) च्या या ग्रुप व्हिडिओ कॉल ची स्पर्धा Whatsaap आणि फेसबुक मैसेंजर यांच्याशी असणार आहे. या मध्ये ऐनिमेटेड इमोजी आणि ऐनिमेटेड बैकग्राउंड पण बघायला मिळणार आहे. या बदललेल्या अपडेट मध्ये अजून एक नवीन फिचर मिळणार आहे ते म्हणजे ग्रुप ओडियो कॉलला व्हिडिओ कॉल मध्ये convert करण्याचे देखील पर्याय असणार आहे. त्यासाठी ओडियो कॉल चालू असताना user ला कैमराच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आतापर्यंत ग्रुप voice कॉल मध्ये जास्तीत जास्त 30 जन अॅड करण्याचा विकल्प होता. पण आता तो unlimited करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी टेलीग्राम (Telegram) ने ग्रुप व्हिडिओ कॉल हे फिचर आणणार असल्याचे जाहीर केले होते.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.