ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरु, ४० दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल…

मुंबई : परमबीर सिंग यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या वर केलेला 100 कोटी रु वसुलीचा आरोप आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वन मंत्री संजय राठोड या दोन घटनांमुळे महाविकास अघाडी सरकार विरोधकांच्या चांगलेच निशाण्यावर आले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना आणि पक्षातील नेते मंडळींना विरोधकांचा खुपच सामना करावा लागला.

मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची 100 कोटी वसुली प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपवल्या नंतर त्यांनी गृह मंत्री पदाचा राजिनामा दिला. काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते व वन मंत्री संजय राठोड यांच नाव पुढे आल्याने त्यांना आपल्या मंत्री पदाचा राजिनामा द्यावा लागला होता.

या संदर्भात आचार्य तुषार भोसले समाज माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, अनिल देशमुख यांना साधूंचा तळतळाट भोवला आहे त्यामुळे त्यांना आपल्या मंत्री पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सुध्दा साधू हत्या पाप फेडावे लागेल. तसेच आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा असून त्यांनाही हे पाप फेडावे लागणार आहे अशी सडकून टीका आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. येत्या ४० दिवसांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असा दावाही आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment