“आघाडी सरकारने केंद्राकडे बोट न दाखवता स्वत: मदत करावी”; देवेंद्र फडणवीस

राज्यात कोरोनाचे संकट ओसरत असतांना आता राज्याला महापूर संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला याचा जबर फटका सोसावा लागतोय. दरम्यान या भागामध्ये राजकीय नेते व अभिनेते पाहणी करत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी पाहाणी केली आणि सोबतच ठाकरे सरकार वर फडणवीस यांनी जोरदार टिकाही केली. ते म्हानाले “राज्य सरकारने आपली बहाणेबाजी बंद करावी. स्वत:ची जबाबदारी झटकून चालणार नाही. आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. आघाडी सरकारनेही केंद्राकडे बोट न दाखवता स्वत: मदत करावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. पूरस्थिती संदर्भात वडनेरे समितीने तयार केलेल्या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. असही ते म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. त्यात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक लोक बेघर झाली. महापूरामुळे शेतीचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमूळे जन- सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान या पूरग्रस्त भागासाठी अनेक राजकीय नेते, अभिनेते व सामाजिक संघटणा मदती साठी समोर आल्या आहे. मराठी अभिनेत्री दिपली सय्यदने पूरग्रस्त भागाची पाहणी करून दहा कोटी रुपये मदतीची घोषणा केली आहे.

ताज्या घडामोडी व रोचक तथ्य आपल्या What’s app वर मिळवा.  

Leave a Comment