हा देश मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पासून देशाला करणार मुक्त , पंतप्रधान म्हणतात आता लोकांची मर्जी..!

कोरोनाची दुसरी लाठ अनेक देशांमध्ये ओसरली आहे तर काही देशांमध्ये अजून देखील तिचे परिणाम दिसत आहे. ज्या देशांमध्ये दुसऱ्या लाठेचा जोर कायम आहे त्या देशांनी निर्बंध कायम ठेवले आहे. पण आता काही देश मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगला मागे टाकून संपुर्ण देश चालू करत असल्याचं दिसतय.
असाच निर्णय ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सोमवारी घेतला आहे. (The country will be free from masks and social distance, says the Prime Minister)

युनायटेड किंगडम च्या नागरिकांना आता लवकरच मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पासून सुटका होणार आहे. कोरोनाच्या बिघडलेल्या परिस्थितीत सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे गरजेचे झाले होते. पण आता U.K मध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामूळे तेथील सरकारने मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पासून मुक्तता करण्याचा निर्णय घेतला आहे. बोरिस जॉनसन यांनी सांगितलं की “नागरिकांना आता कोरोना व्हायरस सोबत जगावं लागणार आहे त्यासोबतच आम्ही निर्बंध कमी करण्याकडे भर देत आहोत.

19 जुलै पासून सरकारी नियमांनूसार देशातील निर्बंध हटवले जाऊ शकतात, असं बोरिस जॉनसन यांनी जाहीर केलं आहे. U.K मध्ये कोरोनामूळे जवळपास सव्वा लाख लोकांचे बळी गेले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाठेमूळे आणि डेल्टा व्हेरिएंटमूळे U.K मध्ये खुप तांडव माजला होता. आतापर्यंत युनायटेड किंगडम मध्ये बहूसंख्य लोकांनी लसीकरण केले आहे.