पानांची शेती करून शेतकरी सक्सेसफुल झाला; 20 गुंठ्यात कमावतो लाखो रुपये..!

शेती मधे पारंपारिक जसे की सोयाबीन, मक्का, कापूस इ. पिके घेऊन शेतकरी वर्षाला खूप कमी उत्पन्न कमावतो. त्यासाठी लागणारा खर्च वजा करता निव्वळ नफा खूप कमी शिल्लक राहतो. पण ही पिके न पिकवता नांदेडचे बारड येथील शेतकरी प्रकाश बोले हे मागील 20 वर्षांपासून नागेलीच्या पानाची यशस्वी शेती करत आहेत. त्यांच्या या 20 वर्षाच्या अनुभवातून खूप काही शिकण्या सारखं आहे. (The farmer became successful by cultivating the leaves, He earns lakhs of rupees in twenty Guntha)..

नागेलीच्या पानाचे आरोग्यासाठी पण खूप फायदे आहेत. आपण सर्वच जेवणा नंतर पाचन शक्ती वाढण्यासाठी नक्कीच पान खात असतो. पण पानाच्या शेतीतून पण शेतकरी लखपती होऊ शकतो हे आपल्याला बोले यांनी दाखवून दिले आहेत.

प्रकाश बोले यांची एकूण 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर  जमीन नागेलीच्या पानाच्या शेतीखाली आहे. ते मागील 20 वर्षांपासून पानाची शेती करत आहे. तसे जर बघितले तर बोले कुटुंबीयांची पानांची शेती हाच पारंपरिक व्यवसाय आहे आणि यातून जवळपास 10 कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो असे त्यांचे सांगणे आहे.

हे पण वाचा – बाप रे ! शेतकर्‍याने अडीच एकरात घेतले तब्बल 18 लाखांचे उत्पन्न; ‘या’ पिकाची केली शेती..!

पान शेतीसाठी येणारा खर्च अत्यंत कमी आणि उत्पन्न जास्त

विशेष म्हणजे पानाची शेती करत असताना कुठल्याही खत किंवा औषधांची गरज नसते. नागिलीचे रोपे बोले स्वतःच घरी तयार करतात. पान शेतीसाठी खर्च खूपच कमी लागतो असे त्यांचे म्हणणे आहे. बोले यांचा पान शेतीचा पारंपरिक व्यवसाय जरी असला तरी ते या व्यवसायाला थोडे तांत्रिक पद्धतीने पण करत आहे. त्यांना वर्षाकाठी 3 लाखांचे उत्पन्न मिळते आणि त्यांचा फक्त 50 हजार एवढा खर्च आहे असे त्यांचे म्हणणे आहे. बोले यांच्या पानाला नांदेड, भुसावळ, परभणी, लातूर, मनमाड या शहरांतून भरपूर मागणी असते.

हे पण वाचा – बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

अशी केली जाते लागवड

सुरुवातीला शेताची खोल नांगरट करून त्यामध्ये रोटरच्या साहाय्याने ढेकळे बारीक करून घेतले. मग पाच फुटावर बेड काढल्यानंतर नागेलीच्या वेलांची लागवड करण्या अगोदर वेलाला वाढताना आधार मिळण्यासाठी बेडवरती शेवरी किंवा शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यात आली. शेवरी आणि शेवगा वेलींना आधार बरोबर सावली मिळाल्यामुळे पानांचे उन्हा पासून संरक्षणं होते. त्यानंतर बेडवरती नागेलीचे एक महिन्याचे रोप लागवड केले जाते.

दोन ओळीतील अंतर हे 5 फूट आणि दोन वेलीतील अंतर हे 1.5 ते 2 फूट ठेवले जाते. लागवडी नंतर जवळ जवळ 5 ते 6 महिन्यानंतर वेलीला पान यायला लागतात. एकदा का पानाची काढणी सुरू झाली की वेलींची वर्षातून 2 ते 3 वेळेस छाटणी केली जाते. या पानांची ३ वर्षापर्यंत तोडणी होते. नंतर पुन्हा लागवड केली जाते.

पान शेती शेतकऱ्यांसाठी ठरू शकते नफ्याची

शहरात आणि ग्रामीण भागात लोक पानाला आवडीने खातात. अगदी 10 रुपया पासून ते 5 हजार पर्यंत पान मिळते. पानाला इथून पुढे खूप मागणी राहण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत लागवड कमी असल्याने पान शेती नक्कीच नफ्याची ठरेल…

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज, सक्सेस स्टोरी आणि शेती विषयक सर्व माहिती आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Reply

Your email address will not be published.