बाप रे !  या शेतकर्‍याने आपल्या 5 एकरात 75 दिवसांमध्ये घेतले तब्बल 13 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

जी लोक म्हणतात की शेती मध्ये काहीच उत्पन्न निघत नाही किंवा शेती व्यवसाय हा बेकार झालेला आहे अशा लोकांनी ही बातमी एकदा पूर्ण वाचावीच कारण त्यानंतर त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. धुळे जिल्ह्यातील एका युवा शेतकर्‍याने आपल्या 5 एकरात 75 दिवसांमध्ये तब्बल 13 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. तीन महिन्यापेक्षाही कमी कालावधीत एवढे उत्पन्न घेऊन या युवा शेतकर्‍यांने ‘आधुनिक पद्धतीने शेती केल्यास हवे तशे उत्पन्न घेता येते’ हे दाखवून दिले आहे. (The farmer in his 5 acres earned an income of Rs. 13 lakhs in 75 days, see what farming does)

मित्रांनो, ज्या शेतकर्‍याविषयी आपण बोलत आहोत ते सागर पवार नावाचे शेतकरी धुळे जिल्ह्यातील पाटण येथील रहिवासी आहेत. त्यांचं शिक्षण B.sc अ‍ॅग्री  झालेलं आहे. आपल्या शेतामध्ये सागर पवार नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. पारंपरिक पद्धतीने पिके घेऊन पिकाला लावलेला खर्चही निघत नसल्याचे सागर यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात या पारंपरिक पिकांव्यतिरिक्त काही वेगळं करण्याचा निर्णय घेतला.

हे पण वाचा – उन्हाळी सोयाबीनने दिला धोका; शेतकरी म्हणतात “उन्हाळी सोयाबीनची पेरणी करताना जरा विचार करा”

या पिकाची केली शेती

पारंपारिक पिके जसे की कापूस, कांदा आणि भाजीपाला असे पिके त्यांच्या शेतात घेतली जायची पण त्यातून चांगलं उत्पन्न निघत नसल्याने आणि शेतीला लावलेला खर्चही निघत नसल्यामूळे त्यांनी आपल्या 5 एकर शेतीमध्ये कलिंगड लावण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या 5 एकरात मायक्रोन मल्चिंगचा वापर केला. त्यांनी दीड फूट अंतरावर कलिंगडाची 55 हजार रोपे लावली.

त्यानंतर त्यांनी रोपांच्या उत्तम आरोग्यासाठी वेळोवेळी खते व औषध फवारणीकडे विशेष लक्ष दिले. प्रतेक 8 ते 10 दिवसांच्या अंतराने खते दिली. अशा प्रकारे काळजी घेतल्याने कलिंगड 75 दिवसातचं बाजारात उपलब्ध करता आले. यामधून त्यांना 13 लाख 32 हजार रुपये मिळाले असल्याची माहिती त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिली.

हे पण वाचा – बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

या बाजार पेठेत केली फळांची विक्री

महाराष्ट्र टाइम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर पवार यांनी कलिंगड स्थानिक बाजारात न विकता दिल्ली व्यापार्यांच्या मदतीने कलिंगड वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले आणि मोठे उत्पन्न मिळवले. तुमच्यात जर मेहनत करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला हवा तसा मोबदला मिळू शकतो हे सागर पवार यांनी दाखवून दिले आहे.

शेतमालाचे ताजे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

Leave a Reply

Your email address will not be published.