बाप रे ! 2 लाख 70 हजार रुपयांचा एक आंबा, भारतातील ‘या’ शेतकऱ्याने केली जगातील सर्वात महागड्या आंब्याची शेती..!

जगातील सर्वात महागड्या आंब्या बद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? आज आपण अशाच एका सर्वात महागड्या आंब्या बद्दल जाणून घेणार आहोत. या एका आंब्याची किम्मत तब्बल 2 लाख 70 हजार रुपये आहे आणि विशेष म्हणजे हा आंबा भारतात मध्यप्रदेश मधील एका शेतकर्‍याने पिकवला आहे. ‘हा’ शेतकरी जगातील सर्वात महागड्या आंब्याची शेती करत आहे. (The farmer in India cultivates the most expensive mango in the world, A mango worth 2 lakh 70 thousand rupees)..

आंबा म्हणजे फळांचा राजा, सर्वांना आवडणारे फळ. उन्हाळा लागला की सर्वांना एकदा आंबा खावासा वाटतोच. आपली खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण शेतामधून किंवा बाजारातून आंबे आणत असतो. बाजारातून आंबे खरेदी करण्यासाठी आपल्याला 50 ते 200 रुपये प्रति किलो दराने पैसे मोजावे लागतात. पण जगात असाही एक आंबा आहे की ज्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये आहे, ते ही एका आंब्याची. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल. सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या माणसाला या आंब्याची खरेदी करणे जवळपास अशक्य आहे.

जबलपूर मधील संकल्प परिहार नावाचे शेतकरी करतात ‘ताईयो नो तामागो’ आंब्याची शेती

हा जगातला सर्वात महागडा आंबा ‘ताईयो नो तामागो’ या नावाने प्रसिद्ध आहे. याला सूर्याचं अंड म्हणून देखील ओळखलं जातं. हा आंबा मुळचा जपानचा आहे. जपान मध्ये या आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पण अलीकडे या आंब्याची शेती मध्यप्रदेश मध्ये असलेल्या जबलपूर मधील संकल्प परिहार नावाचे शेतकरी करत आहे.

हे पण वाचा – बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे, याचे वजन 900 ग्रॅम ते 1 किलो जवळपास असते. या एका आंब्याला बाजारात 2 लाख 70 हजार रुपये इतका भाव मिळाला आहे. मागील वर्षी त्यांच्या शेतातून आंब्याची चोरी झाल्याने त्यांनी आंब्याची कडक सुरक्षा करण्याचा निर्णय घेतला. आता सध्या त्यांच्या शेतात आंब्यांची सुरक्षा करण्यासाठी 3 गार्ड्स व 9 कुत्रे आहेत. आंबे खूप महागडे असल्यामूळे संकल्प परिहार यांना आंब्यांची सुरक्षा करण्यासाठी खर्च करावा लागत आहे.

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजना आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published.