या शेतकऱ्यांना मिळणार नाही PMKSNY योजनेचा फायदा…तुम्ही पात्र आहात की अपात्र हे बघण्यासाठी क्लिक करा..!

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजना (PMKSNY) सुरू केली,
केंदीय मंत्री पियुश गोयल यांनी दि. 01 फेब्रुवारी 2019 रोजी या योजनेची घोषना केली, या योजनेचे वार्षिक बजेट 75000 कोटी आहे.
देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता प्राधान मंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात, प्रतेक टप्प्यात 2000 रुपये पाठवले जातात.

PM किसान सन्मान निधी योजनेची वेबसाइट http://pmkisan.gov.in/ वर दिलेल्या माहिती नूसार कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात येणार याची माहिती दिलेली आहे, ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अपात्र असणार्या शेतकऱ्यांसाठी सरकारने यादी नमुद केली आहे, गरीब शेतकरी या योजने पासून वंचित राहणार नाही अशी सरकारची योजना आहे. अपात्र शेतकरी पुढिल प्रमाणे –

इंजिनिअर, संस्थात्मक शेतकरी, वकील, व्यावसायिक डॉक्टर, सीए

आजी आणि माजी मंत्री, लोक सभा आणि राज्य सभा खासदार, महापौर, आमदार, नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ही सर्व मंडळी या योजनेच्या बाहेर पडलेली आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मध्ये सध्या काम करत असणारे कर्मचारी.

दुसर्याची जमीन तुमच्या कडे गहाण ठेऊन शेती करत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही (जमीन तुमच्या नावावर असायला हवी)

दहा हजारांपेक्षा जास्त पेंशन घेणारे केंद्र व राज्य सरकार मधील अधिकारी या योजनेच्या बाहेर आहे.

मागिल वर्षी आयकर भरणारे शेतकरी सुद्धा या योजनेच्या बाहेर आहे.

31 मार्चपूर्वी रजिस्ट्रेशन करा…
जे या योजनेचे लाभार्थी आहे त्यांनी 31 मार्च पुर्वी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे

या सारखे लेख वाचत राहण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि आपल्या व्यवसायाच्या जाहिराती Read Marathi वर देण्यासाठी आम्हाला [email protected] वर मेल करा..धन्यवाद

1 thought on “या शेतकऱ्यांना मिळणार नाही PMKSNY योजनेचा फायदा…तुम्ही पात्र आहात की अपात्र हे बघण्यासाठी क्लिक करा..!”

Leave a Comment