शेतकर्‍याच्या मुलाने कर्ज काढून सुरू केला व्यवसाय, आज आहे अब्जाधीश; 70 हजार लोकांना देतोय रोजगार..!

Read Marathi Online : आपला भारत देश एक कृषी प्रधान देश आहे, देशातील बहुसंख्य लोक शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. हजारो वर्षांपासून केला जात असलेला हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्यामूळे बेभरवशाचा समजला जातो. उत्पादन हातात येईपर्यंत शेतमालाची काहीच शाश्वती नसते. एखाद्या वर्षी कोरडा दुष्काळ तर एखाद्या वर्षी अतिवृष्टी इत्यादीमूळे शेतकर्‍यांची नेहमीच दयनीय अवस्था झालेली असते.

देशातील शेतकर्‍यांचा सर्वात मोठा गट असा आहे की जो आपल्या मुलांना उच्च शिक्षण देखील देऊ शकत नाही. शेतकर्‍याचा मुलगा पुढे चालून शेतकरीच बनतो. पण एका सामान्य शेतकर्‍याच्या मुलाने इतरांपेक्षा काही वेगळचं करून दाखवलं आहे. गावातील एका सावकाराकडून एक लाख रुपये कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आणि आज केरळ मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादी मध्ये तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. (The farmer’s son started the business by taking out a loan, today he is a billionaire)..

मित्रांनो, हा मुलगा दुसरा कोणी नसून आरपी ग्रुप कंपनीचे चेअरमन बी. रवि पिल्लई (B. Ravi Pillai) हे आहेत. चला तर मग जाणून घेऊया बी. रवि पिल्लई यांचा कठीण प्रवास व संपत्ती बद्दल…

हे पण वाचा : बाप रे ! शेतकर्‍याने अडीच एकरात घेतले तब्बल 18 लाखांचे उत्पन्न; ‘या’ पिकाची केली शेती..!

कर्ज काढून सुरू केला व्यवसाय

बी. रवि पिल्लई यांचा जन्म केरळ राज्यात 2 सप्टेंबर 1956 मध्ये झाला. त्यांना लहानपनापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांचे वडील एक सामान्य शेतकरी होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपला स्वत: चा व्यवसाय असावा अशी त्यांची खूपच इच्छा होती. त्यांच्यात कठोर मेहनत करण्याचं धाडस असल्यामूळे ते हार मानणारे नव्हते.

वडील एक सामान्य शेतकरी असल्यामूळे त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नव्हते. व्यवसाय करण्यासाठी पैसे नसल्याने बी. रवि पिल्लई यांनी आपल्या गावातील एका मोठ्या सावकाराकडून 1 लाख रुपये कर्ज घेतले होते आणि एक चिट-फंड कंपनी सुरू केली होती. कंपनी सुरू केल्यानंतर आपल्या कमाईतून त्यांनी घेतलेले कर्ज फेडले होते. त्यानंतर स्वतः च्या पैशांनी त्यांनी एक कन्स्ट्रक्शन कंपनी उभी केली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूपच चढ-उतार आले पण खचून न जाता ते आपले स्वप्न पूर्ण करण्यात व्यस्त राहीले.

हे पण वाचा : बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

आज आहे 2.5 मिलिअन डॉलर (18,500 कोटी) इतकी संपत्ती

आज या शेतकर्‍याच्या मुलाची देशातील टॉप श्रीमंत व्यक्तींच्या लिस्ट मध्ये गणना केली जाते. त्यांच्याकडे जवळपास 2.5 मिलिअन डॉलर इतकी संपत्ती आहे (भारतीय रुपयांमध्ये 18,500 कोटी रुपये). आज त्यांच्या कंपनीत 70 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी एअरबस H -145 नावाचे हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या हेलिकॉप्टरचे मालक होणारे ते पहिले भारतीय आहे. त्यामूळे काही दिवसांपूर्वी ते खूपच चर्चेत राहीले. एक सामान्य शेतकरी सुद्धा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये येऊ शकतो हे बी. रवि पिल्लई (B. Ravi Pillai) यांनी सिद्ध करून दाखवले आहेत…

शेती विषयक माहिती आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन करा..

Leave a Reply

Your email address will not be published.