कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय..!

या वर्षी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने कांद्याचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली होती. सुरुवातीला कांद्याला चांगला दर मिळत होता म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण अचानक कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडल्यामूळे शेतकऱ्यांचे स्वप्न देखील भंग झाले आहेत.

3 हजार किंवा 3 हजार 300 रुपये प्रति क्विंटलचा कांदा एकदमच 800 ते 1200 रुपयांवर येऊन ठेपल्यामूळे कांद्याला लागलेला खर्चही काढणे कठीण होऊन बसले आहे. अशा कठीण परिस्थितीत आपला कांदा चांगल्या दरात विकावा यासाठी शेतकर्‍यांनी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. (The farmers took this decision to get better price for onion)…

येथे वाचा – बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

शेतकर्‍यांनी घेतला ‘हा’ निर्णय

कांद्याच्या घसरणीमागे अनेक कारणे आहेत, त्यामध्ये विशेष आवक वाढल्याचं आणि आंतरराष्ट्रीय निर्यात ठप्प झाल्याचं बोललं जात आहे. लाल व रांगडा कांद्या पाठोपाठ उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर प्रचंड घसरले आहे. त्यामूळे कांदा विकावा की साठवून ठेवावा असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर होता. पण यावर उपाय म्हणून शेतकर्‍यांनी आता एक निर्णय घेतल्याचं दिसतय. कांदा कवडीमोल भावात विकण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर हाच एकमेव उपाय असल्याचं शेतकर्‍यांकडून बोललं जात आहे. पण हा निर्णय घेतल्यानंतर देखील शेतकर्‍यांना कांदा बराच काळ चांगला टिकवून ठेवण्यासाठी थोडी कसरत करावी लागणार आहे. कांदा बराच काळ टिकवून रहावा यासाठी काही उपाययोजना करणे गरजेच्या आहे.

येथे पहा – आजचे कांदा बाजार भाव

कांदा साठवून ठेवताना ही काळजी घ्या

कांद्याची साठवणूक करताना शेतकर्‍यांसमोर कांदा सडण्याची भीती असते. उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता खरिपातील कांद्यापेक्षा चांगली आहे. कांदा साठवून ठेवण्यापूर्वी कांद्याला वाळवने गरजेचे असते. त्यानंतर त्याचा एका ठिकाणी मोठा ढीग न घालवता कांद्याची साठवणूक करावी. सडलेले कांदे चांगल्या कांद्यांमधून वेळोवेळी बाहेर काढत रहावे ज्यामुळे चांगले कांदे खराब होणार नाही. या व्यतिरिक्त अजून काही उपाययोजना तुम्हाला माहिती असतील तर कृपया कमेन्ट करावी जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल…

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजनांचे अपडेट्स आणि शेती विषयक सर्व माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Reply

Your email address will not be published.