मुलीने कमालच केली! शेणखत विकून महिन्याला कमावते 1 लाख रुपये

Read Marathi Online : आपणच आपला “बॉस” असावं असं प्रत्येक सुशिक्षित तरुण-तरुणींना वाटतं. हाच विचार मनाशी बाळगून MBA झालेली उच्च शिक्षित तरुणी शेण खत विकून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. (The girl earns Rs. 1 lakh per month by selling cow dung)..

सध्याच्या परिस्तितीत जवळपास सर्व सुशिक्षित तरुण-तरुणीं ऐसी (AC) जॉब शोधत असतात. त्यांना शेती व शेती संबंधित व्यवसाय कमी दर्जाचे वाटतात. पण यापेक्षा काही वेगळं करणारे उच्च शिक्षित तरूण-तरुणी आपण खूप कमी बघतो. असच काही वेगळं झुंझुनू येथे राहणार्‍या कविता जाखड यांनी करून दाखवलं आहे, कविता यांचं MBA झालेलं असताना देखील त्यांनी आपल्या गावी येऊन शेण खताचा व्यवसाय सुरू केला आणि आपलं बॉस बनण्याचं स्वप्नं पूर्ण केलं आहे.

हे पण वाचा – बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

MBA झालेल्या कविता जाखड शेण विक्रीतून कमवतात महिन्याला 1 लाख रुपये

कविता यांनी मुंबईला आपलं MBA पूर्ण केलं. कविता या इंग्लीश माध्यमात शिकल्या आहे. शेणाशी काय पण कधी शेतातील मातीशी ही संबंध नसलेल्या तरुणीला शिक्षण पूर्ण झाल्या नंतर कोरोना मुळे गावाकडे परतावे लागले. खुडाना येथे आपल्या घरी परतल्या नंतर शांत न बसता काही तरी स्वतःचा start-up सुरू करावा असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी झुंझुनच्या रिको येथील औद्योगिक क्षेत्रात स्वतःचा कंपोस्ट खताचा उद्योग सुरु केला.

कविता या गायीच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार करतात. सध्या डॉक्टर मार्फत ऑरगॅनिक फूड खा असे सांगण्यात येत असल्याने ऑरगॅनिक fertilizer ला मागणी आहे. चांगल्या प्रतिचे खत तयार होत असल्याने त्या 8 रुपये किलोने खत विकतात. या विक्रीतून त्या दरमहा 1 लाख रुपये महिना कमावतात. सध्या कविता यांच्या उत्तम कामगिरीमूळे तेथील स्थानिक दोन जणांना रोजगार प्राप्त झाला आहे.

कविता यांच्या आईची प्रतिक्रिया

“माझ्या मुलीचा कधीच शेणाशी संबंध आला नाही पण ती आज शेण खत बनविण्याचा व्यवसाय करत आहे. ती या कामा सोबतच शेतकऱ्यांना रासायनिक औषध आणि खतांबद्दल आरोग्यावर होणाऱ्या वाईट परिणामांबद्दल शेतकर्यांमध्ये जागरूकता निर्माण करत आहे. तिच्या या व्यवसायातून इतरांना पण रोजगार मिळत आहे”. म्हणून मी तिला पूर्ण सहकार्य करत आहे. कविताचे आई आणि वडील दोघेही तिला मदद करत आहे.

हे पण वाचा – शेतकर्‍याने अडीच एकरात घेतले तब्बल 18 लाखांचे उत्पन्न; ‘या’ पिकाची केली शेती..!

गांडूळ विक्रीतूनही होते भरपूर कमाई

सुरेंद्र जाखडी आणि पत्नी मनोज देवी या दाम्पत्याची कन्या कविताने अधिक माहिती देताना सांगितले की,
ती फक्त खत विक्रीवर अवलंबून न राहता हाच व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या इतर लोकांना
गांडूळाची पण विक्री करते. शेण खत तयार करण्याच्या प्रक्रियेत एकदा शेणावर गांडूळ सोडले की अडीच ते तीन महिन्यात शेण खत तयार होते. शेण तयार झाल्यानंतर त्यातील गांडूळ फिल्टर च्या मदतीने बाजूला करून खत विकले जाते. नौकरी करून कुणाची गुलामगिरी केल्या पेक्षा स्वतः चा start-up सुरू केलेलं कधीही बरं हे आपल्याला कविता यांच्या यशस्वी स्टोरी मधून शिकायला मिळतं..

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक सर्व माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Reply

Your email address will not be published.