सर्व सामन्यांसाठी आनंदाची बातमी : खाद्य तेलाच्या भावात घसरण..!

शेअर करा

सर्व सामान्य नागरिकांना महागाईच्या खूपच झळा सोसाव्या लागतात. खाण्या पिण्याच्या पदार्थांपासून ते चैनीच्या वस्तूंपर्यंत सर्वत्र दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पण आता सामान्य नागरिकांसाठी अतिशय आनंदाची समोर आली आहे.

खाद्य तेलाच्या दरात घसरण होऊन सामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही घसरण जागतीक बाजारात झाल्याने याचा परिणाम अंतर्गत बाजारातील खाद्य तेलाच्या(edible oil) किंमती वर झाला आहे. महाग झालेले खाद्य तेल आता स्वस्त झाले आहे. भूईमुगाचं तेल सोडून बाकी सर्व खाद्य तेलाच्या किंमती उतरल्या आहे.

येथे वाचा – कापसाचं यंदाही जमलं भो; भाव तेजीतच असणार, हे आहेत कारणे..!

जागतिक बाजाराकडे जर बघितले तर जागतिक बाजारात सध्या मंदी पसरलेली आहे. जागतिक बाजारातील घसरणीने हे भाव घसरले आहे. या कारणाने तेल आयात करणार्‍या व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खाद्य तेलाचे उद्योगही संकटात सापडले आहेत. यामुळे तेल आयात करणार्‍यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. पाम तेलाच्या दरात अजून जवळपास 20 रुपयांनी घसरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाम तेलाच्या दरात बदल होऊन दर 90 ते 92 रु प्रतिकिलो येतील असा अंदाज आहे. याच कारणामुळे उद्योजकांना नुकसान होणार आहे.

येथे वाचा – पैसाच पैसा : या वनस्पतीचे फळं आणि पाने विकून होते जबरदस्त कमाई, जाणून घ्या माहिती..!

अनेक तेलाचे दर घसरले (Many oil prices fell)

सोयाबीन तेल(Soybean oil), मोहरीचं तेल आणि पामोलिन तेलाचे दर विदेशात झालेल्या घसरणीमुळे संकटात आले आहेत. विदेशातील तेलबियांच्या बाजारात(Oilseeds market) प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे परिणामी आयातदार नाराज आहे. यावर उपाय म्हणून आता एक मार्ग सध्या उपलब्ध आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन तेलबियांचे उत्पादन वाढवणे.

Leave a Reply

Your email address will not be published.