पाऊस आला रे आला, राज्यात पावसाचे संकेत

पंधरा ते वीस दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात पाऊसाचा एक थेंबही पडलेला नाही. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात तर सोयाबीन पिकाचे खुप नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची दुबार पेरणी करूनही त्यांच्या हातात चांगल्या दर्ज्याचे उत्पन्न येण्याचे चिन्ह दिसत नाही. दुबार पेरणी आणि त्यात पावसाची दांडी या मध्ये राज्यातील शेतकरी चांगलाच अडकलेला आहे. पण आता हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांना गूड़ न्यूज़ दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.(The meteorological department has forecast rains in the next two to three days)

सोमवार (दि.16) पासून राज्यातील बऱ्याच भागात पाऊस हजेरी लावणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. मराठवाडा आणि विदर्भात विज व जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चटका वाढल्याचे चित्र होते.

जुलै मध्ये कोकण विभाग व पश्चिम महाराष्ट्रात विक्रमी नोंद झालेल्या भागात बऱ्याच ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. दोन ते तीन आठवड्यांपासून पावसाने ब्रेक दिला असल्याने ज्या भागात सुरवातीपासूनच पाऊस कमी आहे अशा भागात सोयाबीन पिकांना पाण्याअभावी फटका बसला आहे.

रोचक तथ्य व महत्वाच्या घडामोडींसाठी ReadMarathi.Com चा WhatsApp ग्रुप जॉईन करा.