शेतकऱ्यांनो सावधान..! ‘या” जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज…

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या खुप दिवसांपासून ढगाळ वातावरण मुक्कामी असल्याचं चित्र आहे. यामूळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. सततच्या या वातावरणामूळे पिकांवर रोगराई वाढली आहे.

या करणाने शेतकरी चिंतेत असतानाच शेतकऱ्यांच्या अजून एका चिंतेत भर पडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीठ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.(The possibility of hailstorms with strong winds in these districts, the weather department forecast …)

गुरुवार आणि शुक्रवारपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. सर्वत्र ढगांची चादर असल्यामूळे सुर्यदर्शन होत नाहीये. काल पश्चिम बंगाल आणि झारखंड मधील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

हे पण वाचा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य भारतात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

येत्या काही तासात या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकानी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान अंदाज आणि शेतमालाचे ताजे बाजार भाव आपल्या मोबाइल वर मिळवा, आजच आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

Havaman Andaj WhatsApp Group

Leave a Comment