कांद्याचे दर 50 ते 60 रुपये होण्याची शक्यता तर लिंबू जेवणातून झाला गायब..!

Read Marathi Online : बर्‍याच दिवसांपासून घसरत असलेला कांदा जून जुलैमध्ये 50 ते 60 रुपये किलोने मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपासून नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात झालेली आहे. आता कांदा खुप स्वस्तात मिळत असल्यामूळे संधीचा फायदा घेत नाफेडने खरेदीला चांगलाच वेग दिला आहे.(The price of onion is likely to be Rs 50 to Rs 60, while the lemon has disappeared from the meal)..

स्वस्तात कांदा खरेदी करण्यात व्यापारीही कमी राहिलेले नाही. व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करत आहे. व्यापारी आणि नाफेड हे दोघेही कांदा खरेदीसाठी तुटून पडल्यामूळे पुढे कांद्याची अधिक मागणी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामूळे येत्या जून जुलै महिन्यात कांद्याचे दर 50 ते 60 रुपये असतील असा अंदाज आहे..

येथे पहा – आजचे कांदा बाजार भाव

भाव वाढीचा सामान्य ग्राहकाला बसेल फटका

सध्या बाजारात कांद्याची आवक जास्त व मागणी कमी अशी अवस्था आहे त्यामूळे शेतकर्‍यांना आपला कांदा खूप कमी किमतीत विकावा लागत आहे. पण थोड्याच दिवसात म्हणजेच जून ते जुलैमध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे सामान्य ग्राहकाला बाजारातून कांदा विकत आणताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे..

लिंबू जेवणातून झाला गायब

कधी काळी कवडीमोल विकला जाणारा लिंबू आज बाजारात धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वी लिंबू बाजारात दहा रुपयांत 5 ते 8 मिळायचे. पण अलीकडे दहा रुपयात एक लिंबू मिळत आहे. त्यामूळे जन-सामान्यांनी लिंबू आपल्या जेवणातून हद्दपार केला आहे. त्याचप्रमाणे लिंबू सरबत विकणार्‍यांनी देखील लिंबू सरबतीचे दर दुप्पट वाढवले आहे. तर काहींनी लिंबूच्या वाढत्या दराला कंटाळून आपली दुकानच बंद केली आहे.

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजनांचे नवीन अपडेट्ससाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

1 thought on “कांद्याचे दर 50 ते 60 रुपये होण्याची शक्यता तर लिंबू जेवणातून झाला गायब..!”

  1. कांद्याचे भाव जुन जुलै मध्ये वाढल्यास आनंद होईल…आपल्या तोंडात साखर पडो…

    Reply

Leave a Comment