कोरोनाची लस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचा काही वेळातच मृत्यू…

मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे, नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे, यावर उपाय म्हणुन ठिक-ठिकाणी लॉकडाउन व लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे, देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. एका 65 वर्षीय नागरिकाचा कोरोनाची लस घेतल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लसी संदर्भात नागरिकांत संभ्रम आहे, लसीकरण करुन घेण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता दिसत आहे. अंधेरी पश्चिमेकडील एक 65 वर्षीय नागरिकाने काल कोरोनावरील लस घेतली, लस घेतल्यानंतर काही वेळातच ते बेशुद्ध पडले. त्यांना अतिदक्षता विभागात भर्ती केले पण काल 5 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमरे यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांचा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे झाला की अन्य कारणामुळे हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल. ते व्यक्ती अन्य आजारनेही ग्रस्त होते. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हा अहवाल ‘एईएफआय’ समितीसमोर ठेवला जाईल असं गोमरे यांनी सांगितलं.

आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यानी विकसीत केलेली ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करीत आहे. सध्या दोन कोरोना व्हॅकसिन उपलब्ध असून, दुसरी व्हॅकसिन(लस) ही भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ ही आहे, अजून सात व्हॅकसिन वर (लशींवर) काम सुरु असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे.

या सारखे लेख वाचत राहण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि आपला लेख आमच्या वेबसाइट वर publish करण्यासाठी आम्हाला [email protected] वर मेल करा..धन्यवाद

Leave a Comment