राज्य सरकार बोगस निघाले; शेतकऱ्याची राज्य सरकार वर टिका..!

अतिवृष्टी किंवा पावसाचा मोठा ब्रेक यापैकी एका तरी कारणामुळे दरवर्षी शेतकरी भरडला जातोच. या वर्षी देखील काही दिवसांपूर्वीच पावसाने मोठा ब्रेक दिला होता. त्यामूळे काही शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीन पिकाची दुसऱ्यांदा पेर करावी लागली. जालना जिल्ह्यात आणि औरंगाबाद मधील सिल्लोड भागात मोठ्या प्रमाणात याचा फटका शेतकऱ्यांना बसला. हा फटका सोसत असतानाच हाती आलेल्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामूळे शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करत आहे. असं जर असेल तर बँकेचे कर्ज कसे फेडावे? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्याचं दिसत आहे. शेती मालाला भाव नसल्यामूळे शेतकऱ्यांनी उभे पिक मोडकळीस काढल्याच्या बऱ्याच घटना जालना जिल्ह्यात घडल्या आहे. अशातच एक शेतकऱ्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याला सरकार जबाबदार असल्याचं या शेतकऱ्याचे म्हणने आहे.

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने बाजारभावाचा अंदाज पाहून फुलकोबी बाजारात न नेता थेट शेतातच मोडली आहे. निसर्ग साथ देत नसताना सुध्दा मोठ्या कष्टानं सदर शेतकऱ्यानं फुलकोबी ची लागवड केल्याचं पाहायला मिळत होतं. रुपये पन्नास हजार खर्च करून देखील समाधान कारक भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. फुलकोबी सोबतच टोमॅटो, हिरवी मिरची या पिकांना किमान आधारभूत किंमत नसल्यानं सदर पीक ही तोट्यात विकावी लागताय किंवा शेतातच मोडली जात आहे.

सोबत शेतकऱ्याने सरकार वर चांगलेच ताशेरे ओढले असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शेतकरी हवालदिल झालेला असताना सरकार आणि विरोधी मात्र एकमेकांसोबत नुसतंच भांडण करण्यात व्यस्त असल्याचं शेतकऱ्याने म्हटले आहे. राज्य सरकार बोगस निघाले असही या शेतकऱ्याने म्हटलं आहे (The state government is bogus; Criticism of the beleaguered farmer on the state government). सरकारने शेतकरी हिताचं रक्षण करण्याचे काम करावं अशी अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

रोचक तथ्य व महत्वाच्या घडामोडी नियमित मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा आणि Facebook पेज लाईक करायला विसरू नका