20 लाखात घर घ्यायचे का? याठिकाणी मिळतेय घर खरेदीला मोठी पसंती..!

Affordable Flat : मागील काही वर्षांमध्ये राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेर असलेल्या पुणे शहराजवळील पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने विस्तारले आहे. या शहरामध्ये प्रचंड प्रमाणात नागरिकीकरण तसेच शहरीकरण घडून आले आहे. आणि महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये मागील काही वर्षांमध्ये औद्योगिकीकरणाला देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड जवळ हिंजवडी एक उपनगर आहे. हे हिंजवडी परिसर आता आयटी हब म्हणून उदयास आले आहे.

विशेष म्हणजे पुणे शहराच्या पाठोपाठ पिंपरी चिंचवड शहर सुद्धा झपाट्याने विकसित होताना दिसत आहे. मागील काही वर्षांपूर्वी मोशी आणि चिखली या परिसराचा शहरामधील इतर काही भागांच्या तुलनेमध्ये कमी विकास झाला होता. हा परिसराला गाव-खेड्याचं रूप आलेलं होतं. पण अलीकडच्या काळात या परिसराचा सुद्धा विकासाचा वेग वाढला आहे.

या भागातमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठमोठ्या गृहप्रकल्पांची (Housing Project) कामे झाली आहेत. याठिकाणी आता शहरीकरण वाढत असून शॉपिंग मॉल, मोठ मोठी दुकाने आणि उच्चभ्रू सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सध्या या भागाची चांगलीच चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या भागात आता हळूहळू शासकीय कार्यालये सुद्धा उभारली जात आहे. या भागाचा झपाट्याने विकास होत असल्यामूळे आता येथे राहण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात गृह खरेदी करण्यात येत आहे. हे सर्व लक्षात घेऊन नागरिकांचे लक्ष इकडे वळू लागले आहे.

म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार लाभ?

ही आहे गृह खरेदीचा कल वाढण्यामागची कारणे

चिखली आणि मोशी या भागात सध्या घर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे महत्वाचे कारण अशे की या भागातून शहरात सहजतेने प्रवेश करता येतो. तसेच शहरामध्ये जाण्याकरिता येथे विविध सुविधा उपलब्ध आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून महापालिकेचे चहोली आणि बो-हाडेवाडी मोशी येथे असलेले गृहप्रकल्प (Housing Project) शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहेत. परिणामी पुढील काळात याठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी वाढण्याची शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार देखील येथून नजीक आहे. भाजीपाला मंडई सुद्धा येथे भरते, त्यामुळे येथील नागरिकांना फ्रेश भाजीपाला मिळतो.

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

या भागात मंदिरे आहेत, त्यामुळे या भागाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोशीत येत्या काळात छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारले जाणार आहे आणि आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रही तयार होणार असल्याची चर्चा आहे. आणि चिखली परिसरात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुद्धा जोराने सुरू आहे. या भागांमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध होत आहे. या भागात 15 एकावर मोठे रुग्णालय उभारले जाणार आहे. याच कारणामुळे या भागात गृह खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या परिसराला नागरिकांची पसंती मिळू लागली आहे.

अशा आहे घराच्या किंमती (Flat in Pune)

या याठिकाणी 1 आरके (1 RK flat) घरांच्या किमती 20 ते 25 लाख या दरम्यान आहे आणि वन बीएचके (1 bhk Flat) 35 ते 45 लाख या दरम्यान असून टू बीएचके घर (2 bhk flat) 45 ते 70 लाख या दरम्यान उपलब्ध आहे. तसेच थ्री बीएचके (3 bhk flat) 70 लाख ते 1 कोटी या किमतीला उपलब्ध आहे. फोर बीएचके घरांसाठी तर एक कोटीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Leave a Comment