आता सोयाबीनमध्ये तेजी येण्याची दाट शक्यता, तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती..!

ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा मोठा साठा शिल्लक आहे अशा शेतकर्‍यांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे कारण अलीकडेच काही तज्ञांनी सोयाबीन संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. (There is a strong possibility of increase in soybean price, experts gave ‘this’ important information)

सोयाबीनला 9 हजार किंवा 10 हजारांच्या पुढे दर मिळेल या आशेने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवलेली आहे. पण मागील 1 महिन्याचा जर विचार केला तर सोयाबीन मध्ये फारशी तेजी बघायला मिळालेली नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन दर वाढीसाठी पोषक वातावरण असले तरी हवी तशी तेजी बाजारात मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. सोयाबीन अजून किती दिवस ठेवायचं? भाव असेच स्थिर राहतील की वाढतील? या प्रश्नांमूळे शेतकरी हैराण झाले आहेत. पण अलीकडेच काही तज्ञांनी सोयाबीन मध्ये तेजी येण्यासाठी पोषक वातावरण बनत असल्याची माहिती दिली आहे.

हे पण वाचा – बाप रे ! कापसाने आणले ‘अच्छे दिन’, शेतकरी म्हणतात ‘कापसाला सोन्याचा भाव’..!

रशिया सरकारच्या ‘या’ निर्णयामूळे सोयाबीन मध्ये येऊ शकते प्रचंड तेजी

सूर्यफुल, मोहरी तेलाच्या निर्याती संदर्भात रशिया 15 एप्रिल नंतर महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

रशिया सरकार 15 एप्रिल पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत सूर्यफुल, सूर्यफुल तेल, मोहरीचे तेल इत्यादीची निर्यात थांबवून देशांतर्गत व्यवसायाच्या भरभराटीसाठी मोठा स्टॉक उभा करण्याच्या तयारीत आहे.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर रशिया सरकारने या तेल बियाणांची निर्यात ठप्प केली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्य तेलाचा मोठा तुटवडा जाणवू शकतो कारण रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये जगात सूर्यफूलाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते आणि त्यातच युद्धामूळे युक्रेन मधून देखील निर्यात ठप्प आहे. त्यामूळे सोयाबीनची प्रचंड मागणी वाढून भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतात असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

येथे पहा – आजचे सोयाबीन बाजार भाव

बाजारातील सोयाबीनची आवक घटली यामूळे सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता

सोयाबीनचा मागील 1 महिन्याचा आलेख जर बघितला तर भाव स्थिर आहे मात्र आवक दिवसेंदिवस घटत असल्याचं दिसत आहे. यामध्ये काही शेतकरी बांधवांकडील सोयाबीन साठा संपला आहे तर काहींनी सोयाबीन अजून काही दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यामूळे बाजारातील सोयाबीनची आवक कमी पडली आहे. बाजारातील आवक कमी पडल्यामूळे सोयाबीनच्या भावात तेजी येणार हे साहजिकच असल्याचं तज्ञांचं मत आहे..

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Reply

Your email address will not be published.